शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संजय गांधी वसाहत : पाण्यामुळे आरोग्याची लागली वाट, नागरिकांच्या आरोग्याला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 01:56 IST

पुणे शहरातील मनपाच्या वारजे क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेल्या संजय गांधी वसाहतीमधील रहिवाशांना गेल्या आठ दिवसांपासून अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पालिकेच्यावतीने पुरवठा करण्यात येत आहे.

पुणे : शहरातील मनपाच्या वारजे क्षेत्रीय कार्यालयाजवळ असलेल्या संजय गांधी वसाहतीमधील रहिवाशांना गेल्या आठ दिवसांपासून अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पालिकेच्यावतीने पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अलंकार पूल येथील संजय गांधी वसाहतीमधील नागरिकांना पालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने नळावाटे अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. या पाण्यामध्ये प्रचंड कचरा स्पष्ट दिसून येत आहे. कपडे धुण्यासाठी या पाण्याचा वापर करणे कठीण झाले आहे, तर पिण्याचा प्रश्नच सोडा!पालिकेकडून होणाºया अत्यंत दूषित पाणीपुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. लहान मुले, वृद्धांमध्ये पोटदुखी, डोकेदुखी, मळमळ, हगवण अशा विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.स्थानिकांनी पालिकेच्या अधिकाºयांकडे गेल्या सहा दिवसांत अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. वारजे क्षेत्रीय कार्यालय एवढ्या जवळ असूनही या प्रकरणाची कुठलीही दखल पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाºयांकडून घेण्यात आलेली नाही. पालिका कर्मचाºयांच्या गारठलेल्या कारभाराविरुद्ध स्थानिक संताप व्यक्त करीत आहेत. येथील स्थानिक नगरसेवकदेखील या प्रकरणाकडे कानाडोळा करीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वेळोवेळी संपर्क करूनसुद्धा नगरसेवक प्रतिसाद देत नाहीत. या प्रकारामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. आंदोलनाच्या तयारीत नागरिक आहेत. आत्यामुळे दूषित पाण्याने ग्रस्त असलेल्या या वसाहतीतील नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्नच आहे.वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घाणेरड्या पाण्याचा पुरवठा होत आहे. पालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक या प्रश्नांबाबत गंभीर नाहीत. गेल्या सहा दिवसांपासून आरोग्यासोबत मानसिक त्रासाला येथिल नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.- तुकाराम येडके, स्थानिकया वसाहतीमध्ये होणाºया पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मिळाल्यानंतर, संबंधित पालिका कर्मचाºयांना पाईपलाईन दुरुस्तीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. लकरच शुद्ध पाण्याच्या पुरवठ्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांना काही दिवस झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.- जयंत भावे, नगरसेवक म.न.पा.पुणेआम्ही गेल्या चार दिवसांपासून या समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. जलवाहिन्या जमिनीमध्ये खूप खोलवर गाडल्या गेल्या असल्यामुळे त्यामुळे नक्की कुठे सांडपाण्यामध्ये पिण्याचे पाणी मिसळले जात आहे, हे समजून येत नाही. या कामासाठी आम्ही तब्बल आठ कर्मचाºयांवर जबाबदारी सोपवली आहे. तरीदेखील आम्ही समस्येच्या मुळाशी जाण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत.- संतोष लांजेकर, पाणीपुरवठा अधिकारी,वारजे क्षेत्रीय कार्यालय

टॅग्स :Waterपाणी