शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

एकाचवेळी तिघा तरुणांच्या अपघाती मृत्युने तळजाई, पदमावती परिसरावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 2:44 PM

वाढदिवस साजरा करुन खेड शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.

पुणे/ धनकवडी : वाढदिवस साजरा करुन खेड शिवापूर येथील दर्ग्याच्या दर्शनासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यु झाला. तर ५ जण जखमी झाले आहेत. एकाचवेळी तिघा तरुणांच्या अपघातील मृत्युने तळजाई, पद्मावती परिसरावर शोककळा पसरली़. सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे झालेल्या या अपघातात सुशील गोपाळ कांबळे (वय २३, रा. तळजाई पठार), सुरज शिंदे (वय २४) आणि अनिकेत भारत रणदिवे (वय २३) यांचा मृत्यु झाला़. सुशील कांबळे याचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे सोमवारी रात्री अकरा वाजता सुशिल याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मित्र तळजाई टेकडीवर एकत्र आले. त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर सुशिल ने आपल्या आईला संपर्क साधून खेड शिवापूर ला जात असल्याचे सांगितले. पण, शिवापूर येथील दर्ग्याचे दर्शन घेण्यापूर्वीच अपघात झाल्याने ते परतलेच नाही़. अनिकेत रणदिवे याचेआई वडील भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करतात़. अनिकेत खाजगी कंपनी मध्ये कामाला होता. त्याच्या पाठीमागे तीन लहान भाऊ आहेत. सुरज शिंदे याचे वडील भंगार व रिक्षाचा व्यवसाय करतात. एक भाऊ आहे. सुरज याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याची पत्नी पाच महिन्याची गर्भवती आहे. तिच्यावर मोठा आघात झाला आहे़  सुशिल उर्फ गोट्या कांबळे याच्या वडिलांचे त्याच्या लहानपणीच निधन झाले होते. घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आई धुण्याभांड्याची कामी करते. सुशिल हा शुभंम कुरकरे या दुकानात कामाला होता. या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर येथे नेण्यात आले आहेत़. अन्य जखमींवर भोर तालुक्यातील श्लोक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत़. 

 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यू