शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पावसासाठी मिठाचा धूर अन् वरूणराजाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:36 IST

बारामतीच्या जिरायती भागात गेल्यावर्षी बासरी वाजून पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला होता...

ठळक मुद्देमहिलांची केविलवाणी धडपड : रिमझिम पावसाचा शिडकावा

चंद्रकांत साळुंके काऱ्हाटी  : सततच्या दुष्काळामुळे बारामतीचा जिरायती भाग होरपळून निघाला आहे. पावसाळा संपत आला, तरी हा परिसर कोरडाच राहिला. घोटभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे. आता तर पाऊस पाडण्यासाठी केविलवाणी धडपड देखील या भागात सुरू झाली आहे. काºहाटी येथील महिलांनी पाऊस पडावा म्हणून पालापाचोळ्याचा व मिठाचा धूर करीत वरूणराजाची याचना केली अन् काय ज्या भागात प्रयोग केला गेला, त्याठिकाणी ढग जमा झाले त्या ठिकाणी अचानक रिमझीम पावसाला देखील सुरुवात झाली.  बारामतीच्या जिरायती भागात गेल्यावर्षी बासरी वाजून पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला होता. तशा दंतकथा इतिहासात प्रसिद्ध आहेत; मात्र या भागावर वरूणराजा कायम रुसलेला राहिला आहे.  सध्याच्या स्थितीत मराठवाडा परिसरात सध्या कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू आहे. मिठाच्या धुरामुळे पाऊस पडतो, असे येथील नागरिकांनी ऐकले होते.  दुष्काळाच्या दुष्टचक्रातून मुक्ती मिळावी अन् पाण्याची पायपीट थांबावी, यासाठी येथील महिलांनी एकत्र वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी   पालापाचोळा जाळून मिठाचा धूर करण्याचे ठरवले. जिरायती भागात पावसाळ्यामध्ये पाऊस नसल्यामुळे शेतातील कांदा, बाजरी, मका आदी पिके जळून चालली आहेत. यामुळे गणेशनगर येथील बचत गटातील फुलाबाई साळुंके, रुक्मिणी साळुंके, अलका साळुंके, साधना साळुंके, अर्चना साळुंके, शिल्पा साळुंके, विजया साळुंके, सुलोचना साळुंके, पूजा वाबळे, प्रिया साळुंके, राधिका साळुंके आदी महिलांनी एकत्र येऊन पावसासाठी परंपरागत प्रयोग करण्याचे ठरवले.  महिलांनी शेतातील काढलेले गवत, तसेच ओला पालापाचोळा मोठ्या प्रमाणात एकत्र केला व तो पालापाचोळा अवकाशात काळे ढग जमा झाल्यावर पेटवला. त्यात मिठाचा शिडकाव करण्यात आला. त्यामधून मोठ्या प्रमाणात निघालेला धूर उंच जाऊ लागला. वरूणराजानेही महिलांचा हा प्रयत्न बघत भरून येत या परिसरातील जळकेवाडी, भिलारवाडी परिसरात हलक्या स्वरूपात बरसला. काही वेळाने प्रयोग केलेल्या काºहाटी परिसरात देखील रिमझीम पावसाला सुरुवात झाली. हलक्या स्वरूपात का होईना पाऊस झाल्याने येथील नागरिक आनंदी होते. पाऊस-पाण्यासाठी करण्यात येणारा हा प्रयोग अगदी साधा सोपा आहे. पूर्वी लोक गावाबाहेर येत असे ढोल-लेझीमच्या आवाजामध्ये पावसाला आडवे जात; तसेच बासरी वाजून पाऊस पाडण्याचा प्रयोग देखील याच भागात केला गेला आहे. अशाच पद्धतीत मिठापासून धूर तयार करू मिठामध्ये असलेल्या सोडियम ढगांमध्ये गेल्यामुळे वाफेचे पाण्यात रूपांतर होते व पाणी जड असल्यामुळे पाऊस पडतो, अशी उदाहरणे आहेत असे माजी मुख्याध्यापक के. के. वाबळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती