शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील वेतन निश्चिती रखडली

By admin | Updated: June 21, 2016 00:39 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करताना शैक्षणिक अर्हता उंचविण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल २०० कर्मचाऱ्यांच्या पद निश्चितीचा व वेतन निश्चितीचा प्रश्न निर्माण झाला

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करताना शैक्षणिक अर्हता उंचविण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल २०० कर्मचाऱ्यांच्या पद निश्चितीचा व वेतन निश्चितीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाने या भरतीमध्ये काही त्रुटी काढल्या आहेत. मात्र, विद्यापीठाने सर्व पदांची भरती नियमानुसारच राबविली असल्याचे विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या कार्यकाळात विद्यापीठात नोकरभरती घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे विद्यापीठातील नोकरभरती नियमानुसार व पारदर्शकपणे करण्याचे विद्यापीठासमोर मोठे आव्हान होते. विद्यापीठाने २०१३ मध्ये सुमारे २१० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविली. मात्र, ही भरती प्रक्रिया राबविताना उमेदवारांची शैक्षणिक अर्हता अधिक ठेवण्यात आली. त्यामुळे पदनिश्चिती व वेतन निश्चितीबाबत अडचणी येत असल्याचे पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे म्हणाले, की विद्यापीठ कायद्यातील परिनियम ५/११ नुसार पुणे विद्यापीठाने भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. कायद्यातील परिनियमानुसार शासनाच्या पूर्वपरवानगीने अध्यापकेतर, कुशल प्रशासनिक, लिपिकवर्गीय आणि इतर पदे निर्माण करणे व त्यांची अर्हता आणि वेतननाम विहित करणे आणि त्या पदांवर नियुक्ती करणे आवश्यक आहे. मात्र, २0१३ मधील पदभरती करताना शैक्षणिक अर्हता उंचविण्यात आली. त्यासाठी विद्यापीठाने परिनियम तयार करणे अपेक्षित होते. त्यामुळे वेतन निश्चितीची प्रक्रिया थांबविण्यात आली, त्याबाबत उच्च शिक्षण सचिवांबरोबर बैठक घेण्यात आली आहे. त्यांच्याकडे हा विषय प्रलंबित आहे. (प्रतिनिधी)