सराईत सोनसाळखी चोरांना रंगेहात अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 08:55 PM2018-06-15T20:55:19+5:302018-06-15T20:55:19+5:30

खडकी परीसरात पायी जात असलेल्या महिलेल्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावणा-या दोघां सराईतांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे. 

Sainte sticks to the stolen thieves | सराईत सोनसाळखी चोरांना रंगेहात अटक 

सराईत सोनसाळखी चोरांना रंगेहात अटक 

Next

पुणे : खडकी परीसरात पायी जात असलेल्या महिलेल्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावणा-या दोघां सराईतांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे. 

      परेश किशोर धावरी (वय २८) आणि आकाश राजेश कंडारे (वय २२, दोघेही रा. शंकराराव चौक, गुजराती शाळा, कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांनी मंगळसुत्र चोरीचे ९ गुन्हे केल्याचे कबुल केले असून त्यांच्याकडून १९३ ग्रॅम वजनाचे ५ लाख ९५ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ७ जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास खडकीतील शेवाळे हॉस्पीटल जवळून जात असलेल्या लता सुब्रमण्यम यांचे मंगळसुत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांना चोरल्याची माहिती खडकी पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त दिपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी व विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि गुन्हा घटलेल्या परिसरात पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलीस कर्मचा-यांनी आयप्पा मंदिराजवळ सापळा लावला. मात्र दिघेही आरोपींनी तेथून  पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पाठलगू करून आरोपींची दुचाकी पकडली व त्यांना अटक केली. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे लता सुब्रमण्यम यांनी दिलेल्या फिर्यादीतील सोन्याचे मंगळसुत्र मिळाले. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक, पोलीस कर्मचारी हेमंत माने, तुषार शिंदे, किरण घुटे, अण्णा ठोकळ, रणधीर माने, सुरेश गेंगजे, लक्ष्मण बांगर, बाबा शिर्के यांनी ही कामगिरी केली.   

Web Title: Sainte sticks to the stolen thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.