शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

गल्लीबोळांमध्ये महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर

By admin | Updated: April 30, 2017 05:15 IST

वेळ रात्री १०.३०ची... नळस्टॉपच्या बँक आॅफ इंडियाच्या गल्लीमध्ये एक तरुणी तोंडाला रूमाल लावून चालली होती... अचानक एक मुलगा बाईकवर आला आणि मागे बस म्हणू लागला...

- नम्रता फडणीस,  पुणे

वेळ रात्री १०.३०ची... नळस्टॉपच्या बँक आॅफ इंडियाच्या गल्लीमध्ये एक तरुणी तोंडाला रूमाल लावून चालली होती... अचानक एक मुलगा बाईकवर आला आणि मागे बस म्हणू लागला... कोण आहे हा, असं काय बोलतोय... मुलगी प्रचंड घाबरलेली होती... तिचा हात पकडून तो गाडीवर बसण्याचा आग्रह करीत होता... तो ऐकत नाही म्हटल्यावर ती मुलगी त्याच्या हाताला चावली... तिच्या हाताला ओरखडून तो पसार झाला... त्याच घाबरलेल्या अवस्थेत ती पळत सुटली आणि बसस्टॉप गाठून घरी पोहोचली... या अनपेक्षित प्रसंगाचा तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता... हा अनुभवकथन करताना देखील तिच्या डोळ्यांत भीती जाणवत होती. गल्ल्यांमधून जाताना असभ्य वर्तन करणे, मुलींवर जबरदस्ती करणे असे प्रकार पुरुषांकडून होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामधून शहरातल्या गल्ल्यांमधील महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरच असल्याचे दिसून आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये असे अनेक गल्लीबोळ आहेत, ज्याकडे कुणाचेच लक्ष नसते, अगदी पोलिसांचेदेखील! रात्री आठ वाजता अनेक क्लास सुटतात. मुलींना बसस्टॉपपर्यंत एकटे जावे लागते. जिथे रात्रीच्या वेळी लाईट नसल्यामुळे पुरुषांना दबा धरून बसण्यासाठी मोक्याच्या जागा मिळतात. एक जरी मुलगी तिथून रात्रीच्या वेळी गेली तर त्यांना आयतेच सावज सापडते. तिचा पाठलाग करणे, विनयभंग करणे, अश्लील वर्तन करणे असे प्रकार घडत आहेत. एकतर्फी प्रेमातून आमदाराच्या मुलीवर झालेला हल्ला ताजा असतानाच यांसारख्या अनेक प्रकारांमुळे दिवसागणिक महिलांच्या असुरक्षिततेमध्ये अधिकच भर पडत आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत, ज्यामध्ये रस्त्यावर किंवा कारमध्ये असे काही प्रसंग घडले तर पोलिसांना तत्काळ सूचित करण्यासाठी ‘प्रतिसाद’ अ‍ॅपपासून आयटी कंपनीमधील महिलांसाठी बडी कॉप सारखी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु जेव्हा असे अनपेक्षित प्रसंग ओढवतात तेव्हा मुली आधीच खूप घाबरलेल्या असतात, त्यामधून त्या सावरू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना या यंत्रणेचा वापर करणे पटकन सुचत नाही. त्यामुळे अशा घटनांमध्ये केवळ याच उपायांवर अवलंबून राहणे उपयोगाचे नाही. आज शहरांमधील प्रमुख रस्त्यांवर गस्त घातली जाते पण मध्यवस्तीतील गल्लीबोळांचे काय? त्या भागांमध्येही रात्री दहानंतर गस्त घालण्याची गरज आहे. पोलिसांकडून ती घातली जात असल्याचा दावा केला जात असला तरी मात्र ती घातली जात नसल्याचे मुलींच्या अनुभवावरून दिसून आले आहे. गल्लीबोळांमधून जाणे फारसे सुरक्षित वाटत नाही, कारण कोण कुठे दबा धरून बसले असेल हे सांगता येत नाही. मैत्रिणी बरोबर असतात तेव्हा आधार असल्यासारखा वाटतो, पण एकटीला गल्लीबोळांमधून जायला भीती वाटते. बऱ्याच वेळा लाईटही नसतात, त्यामुळे दबकत दबकतच जावे लागते.- तरुणीगल्लीबोळांमध्येच नव्हे तर बसस्टॉपवर एकट्या मुलीला उभे राहायचे म्हणजे टेन्शन येते. सकाळी ९.३0ची वेळ होती. परीक्षेला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी होते. बस ज्या बाजूने येणार आहे त्याच बाजूला एक माणूस बसला होता, तेव्हा लक्ष गेले तर तो माणूस पँटची चेन ओपन करून अश्लील कृती करीत होता. खूपच भीती वाटली आणि मी तिथून उठून दुसऱ्या बाजूला उभे राहिले.- तरुणीपोलिसांकडून महिलांच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले जाते. यासाठी दामिनी पथक, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कार्यान्वित करण्यात आलेले पुरुषांचे बीट मार्शल आणि पोलिसांच्या गाड्या या माध्यमातून रात्रीच्या वेळेसही गस्त घातली जाते. महिलांसाठी प्रतिसाद अ‍ॅप आणि हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना काहीअंशी आळा बसला आहे. - पी. आर. पाटील, पोलीस उपायुक्त