शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

’सेफ जर्नी’ मराठी वेबसीरिज मधून मिळणार लैंगिक शिक्षणाचे धडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 12:51 PM

ब-याचदा शरीर संबंध, एचआयव्ही किंवा नैराश्यातून उदभवणा-या लैंगिक समस्या या संदर्भात वरवरची माहिती तरुण पिढीला मिळते.

- नम्रता फडणीसपुणे :   लैंगिक आरोग्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान तरुणपिढीला मिळतेच असे नाही. ब-याचदा शरीर संबंध, एचआयव्ही किंवा नैराश्यातून उदभवणा-या लैंगिक समस्या या संदर्भात वरवरची माहिती तरुण पिढीला मिळते. स्वत:ला जाणवणा-या समस्या कुणाला तरी सांगायच्या आहेत; पण कुणी त्या शांतपणे ऐकून घेईल असे त्यांना वाटत नाही. यातून गुंता वाढून मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी प्रयास हेल्थ ग्रुप या स्वयंसेवी संस्थेने (पीएचजी) दोन वर्षे केलेल्या संशोधनातून   ‘सेफ जर्नीज’ या मराठी वेबसीरिज निर्मित केली आहे.  ‘इंफोटेन्मेंट’च्या  वेगळ्या प्रयोगाद्वारे युवापिढीला ‘सेफ जर्नी’चा सल्ला देण्यात आला आहे. अविवाहित तरूण-तरूणींचे लैंगिक आरोग्य आणि त्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी  प्रयास हेल्थ ग्रृप ( पीएचजी) 2017 मध्ये  संशोधनाचे काम हाती घेतले. त्यातून समोर आलेल्या निवडक विषयांवर ही वेबसिरीज तयार करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे, सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिरीजच्या पहिल्या भागाला तरूणाईकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे.     ’सेफ जर्नीज’ मध्ये लैंगिकता आणि लैंगिक आरोग्याशी निगडित 8 विविध विषयांवरच्या माहितीपर शॉर्ट फिल्मसचा समावेश आहे. यामध्ये सुरक्षित संभोग, हस्तमैथून, पॉर्नचे व्यसन, निर्णयक्षमता, मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना असलेली पाठिंब्याची गरज, अनैच्छिक मातृत्व, सकारात्मक स्वप्रतिमा, लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि मान्यता याविषयांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तरूणाईला लैंगिकतेशी निगडित भेडसावणारे प्रश्न आणि आरोग्य दृष्टीकोनातून त्याचा स्वीकार करण्याची असलेली गरज यावर भाष्य करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रयास हेल्थ ग्रृपच्या रितु यांच्याशी  ‘लोकमत’ने संवाद साधला. त्या म्हणाल्या, पीएचजीने 20 ते 29 वयोवर्ष गटातील जवळपास 1240 अविवाहित मुलांशी संवाद साधून त्यांचे लैंगिक आरोग्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला. दोन वर्षांपूर्वी संस्थेने सुरू केलला संशोधनात्मक प्रकल्प आता अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. लवकरच आम्ही त्याचे निष्कर्ष जाहीर करणार आहोत.त्या गोष्टी चांगल्या किंवा वाईट याबाबत कोणत्याही न्यायिकतेच्या भूमिकेत न जाता आम्ही वास्तववादी निष्कर्षाची मांडणी करणार आहोत. या वेबसिरीजमधील दोन शॉर्ट फिल्म्स अनुक्रमे अलोक राजवाडे आणि वरूण नार्वेकर यांनी तर 4 फिल्म्स अनुपम बर्वे यांनी दिग्दर्शित केल्या आहेत. यामध्ये सुवर्त जोशी, पर्ण पेठे, अक्षय टांकसाळे, शिवानी रंगोले यांनी भूमिका केल्या आहेत. अलोक राजवाडे आणि मृण्मयी गोडबोले हे संवादकाच्या भूमिकेत आहेत. .....’’ लैंगिकतेबददल खुलेपणाने बोलले जात नाही. एखादा मुलाची देहबोली बायकी  किंवा मुलीची पुरूषी असेल तर त्यांच्यावर टिका केली जाते. प्रयास संस्थेने केलेल्या संशोधनातून काही विषय समोर आल्यानंतर त्यावर तू शॉर्टफिल्म करशील का? अशी मला विचारणा झाली. त्यातून 5 लेखक आणि संशोधक तज्ञांच्या मदतीने आम्ही 8 संहिता तयार केल्या. त्याचा पहिला भाग नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. - अनुपम बर्वे, दिग्दर्शक 

टॅग्स :PuneपुणेWebseriesवेबसीरिज