शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्गुरू शंकर महाराजांचा ७३ वा समाधी सोहळा अभिनव पद्धतीने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 6:48 PM

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊन लक्षात घेत सद्गुरू शंकर महाराजांचा ७३ वा समाधी सोहळा अभिनव पद्धतीने साजरा..

ठळक मुद्देऑनलाईन पूजा, अभिषेक, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत, गरजूंना महाअन्नदान

पुणे : धनकवडी येथील सद्गुरू शंकर महाराज मठ म्हणजे देशाविदेशातील लाखो शंकर महाराज भक्तांचे अढळ श्रद्धास्थान आहे. श्री सदगुरू संतवर्य शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने दरवर्षी  एप्रिल , मे दरम्यान साजरा केला जाणारा सद्गुरू शंकर महाराज समाधी सोहळा म्हणजे भक्तांसाठी मोठ्या आनंदाची पर्वणी असते. यंदा मठातर्फे सद्गुरू शंकर महाराजांचा ७३ वा समाधी सोहोळा २४ एप्रिल ते २ मे दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊन लक्षात घेऊन समाधी ट्रस्टच्या वतीने हा सोहळा अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आल्यामुळे तो सर्वत्र चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरला.

श्री सदगुरू संतवर्य शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने  मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) या निधीस रू १० लाखांचे अर्थ साहाय्य करण्यात आले.तसेच ससून हॉस्पीटल देणगी समितीस आौषधे व साधन सामुग्री करीता रू ५ लाख देण्यात आले.शासनाच्या आदेशानुसार श्री शंकर महाराज समाधी मंदिर (मठ), ७३ व्या समाधी सोहळ्याच्या काळात सुद्धा बंद ठेवण्यात आले. पोलीस प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे मठाच्या विश्वस्तांनी काटेकोरपणे पालन केले. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य भक्तांसोबतच महापौर, आमदार, नगरसेवक, पोलीस  व प्रशासकीय अधिकारी अशा पदाधिकारी भक्तांनी देखील शंकर महाराजांचे दर्शन, मठाच्या दरवाजा बाहेरूनच  घेऊन विश्वस्तांना सहकार्य केले. तसेच दर्शनासाठी दरवाजा उघडावा, म्हणून मठाच्या सिक्युरिटी कर्मचा?्यांना कोणताही त्रास दिला नाही. दर्शनासाठी मठाच्या दारात आलेला भक्त उपाशी राहता कामा नये, अशी शंकर महाराजांची ईच्छा असल्याने मठातर्फे दररोज खिचडीचा प्रसाद आणि सोहळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते.  कोरोनाच्या पाश्रर््वभूमीवर यंदा ७३ व्या समाधी सोहळ्यानिमित्त  विद्यार्थी, बेरोजगार मजुर, गरीब कुटुंबे अशा हजारो  वंचितांना खिचडीच्या प्रसादचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक भक्तांनी अन्नदानासाठी ?ानलाईन देणग्या देऊन आर्थिक साहय्य केलं.भक्तांना समाधी सोहळा सप्ताहात दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून विश्वस्तांकडून अभिनव पद्धतीचा अवलंब करण्यात आला. फेसबुक व व्हॅट्सअपवर दररोजच्या पुजेचे तसेच मठाच्या परिसरातील फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्यात आले. त्यामुळे समाधी मंदिर बंद असले, तरीही  भक्तांना निर्विघ्नपणे  शंकर महाराजांचे दर्शन घेणे शक्य झाले. त्यामुळे जणू महाराज आपल्या सोबत आहेत, याची प्रचीती भक्तांना आली. यावेळी मठातील धार्मिक विधी व पारंपारीक शोडषोपचार, प्रतिकात्मक रीतीने पार पाडण्यात आले. यावेळी सर्व सेवेकरी व कर्मचार्यांनी पुजा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी  खूप मेहनत घेतली.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इंटरनेटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ११ गुरुजींनी घरूनच रुद्र पठण करुन लघुरुद्र अभिषेक केला व  आधुनिक संकल्पना स्विकारण्यात मठ, मंदिरेही मागे नाहीत हे दाखवून दिले. भक्तांनी आपापल्या घरी महाराजांची पूजा, नैवेद्य, पारायण, भजन करून हा सोहळा साजरा केला आणि त्याचे फोटो व्हिडीओ अपलोड केले.

अशाप्रकारे  सामाजिक भान ठेवून सोहळा पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल विश्वस्तांनी सर्व भक्तांचे आभार मानले. तसेच कोरोनाचे  संकट लवकरात लवकर दूर होऊन भक्तांना श्रींच्या समाधीचे दर्शन घडावे, अशी सद्गुरु शंकर महाराज चरणी प्रार्थना केली. करोनाच्या पाश्रर््वभूमीवर लॉकडाऊन संपेपर्यंत मठात शिधा, देणगी स्विकारण्यात येणार नसल्याने  भक्तांनी समाधी परिसरात येवू नये; पोलीस, सिक्युरिटी, व्यवस्थापन कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री सदगुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट, पुणे च्या विश्वस्तांनी केले आहे. या वेळी  अध्यक्ष भगवान खेडेकर , सचिव सुरेंद्र वाईकर, विश्वस्त चंद्रकांत मालपाणी, सुरेश येनपुरे, सदानंद खामकर, नागराज नायडू, प्रताप भोसले उपस्थित होते.-------------

टॅग्स :DhankawadiधनकवडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTempleमंदिर