"ऊस आला की कोल्हा खायला जातो", अशी राष्ट्रवादीची अवस्था; सदाभाऊ खोत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 19:55 IST2022-05-29T19:39:18+5:302022-05-29T19:55:16+5:30

खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केल्यानंतर त्याचा समाचार माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतला

Sadabhau Khot Criticism of NCP | "ऊस आला की कोल्हा खायला जातो", अशी राष्ट्रवादीची अवस्था; सदाभाऊ खोत यांची टीका

"ऊस आला की कोल्हा खायला जातो", अशी राष्ट्रवादीची अवस्था; सदाभाऊ खोत यांची टीका

पिंपरी : शेजाऱ्याच्या घरी पाळणा हालायला लागला तरी राष्ट्रवादी काँग्रेसवाले पेढे वाटतात. ऊसाला लागला कोल्हा, अशी त्यांची अवस्था आहे. उस आला की कोल्हा खायला जातो, अशी टीका राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली.

बैलगाडा शर्यतीवरून राजकारण सुरू आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केल्यानंतर त्याचा समाचार माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतला. ते म्हणाले, ‘‘२०१४ मध्ये बैलगाडा शर्यतीवर बंदी ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने आणली होती. ती बंदी उठविण्यासाठी भाजपाने पहिला अध्यादेश काढला. विधानसभेत विधेयक आणले. ख२े तर बंदी कोणी कोणाच्या काळात आणली. हे तपासून पहावे मग टिका करावी.’’

शिवसनेने अपमान केला

राज्यसभेच्या जागेवरून सुरू असणाऱ्या राजकारणावर खोत म्हणाले, ‘‘सातारा आणि कोल्हापूरची गादीचा आम्ही सन्मान आदर करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत. त्यांचा अपमान शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या शिवसेनेने केला. याचे दुःख महाराष्ट्रातील जनतेस आहे.’’

Web Title: Sadabhau Khot Criticism of NCP