शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘मतदारजागृती’स गर्दी भाजपाचीच

By admin | Updated: September 28, 2016 04:40 IST

मतदार जनजागृती अभियानांतर्गत निवडणूक विभागाच्या वतीने राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यास भाजपा कार्यकर्त्यांची अधिक गर्दी होती.

पिंपरी : मतदार जनजागृती अभियानांतर्गत निवडणूक विभागाच्या वतीने राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यास भाजपा कार्यकर्त्यांची अधिक गर्दी होती. त्यामुळे सत्तारूढ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जागा मिळाली नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थायी समिती सभागृहात झालेल्या मतदार जनजागृती अभियानांतर्गत राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना व आरपीआय महायुती आघाडीच्या गटनेत्या सुलभा उबाळे, मनसे गटनेते अनंत कोऱ्हाळे, राजीव भालेराव, मोहन आडसूळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रामदास मोरे, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सारंग कामथेकर, राष्ट्रीय वाल्मीकी सेना पार्टीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह छाजछिडक, महासचिव पुरणचंद बिडलान, बहुजन समाज पार्टीचे अशोक गायकवाड, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने, क्षेत्रीय अधिकारी सुभाष माछरे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, चंद्रकांत खोसे, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रवींद्र जाधव, सहकार विभागाचे उपनिबंधक प्रतीक पोखरकर आदी उपस्थित होते.अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे म्हणाले, ‘‘पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारनोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करून घ्यावी.’’सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने म्हणाले, ‘‘शहरातील नोंदणीकृत गृह निर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिवांचे सहकार्य मतदारनोंदणीसाठी घेण्यात येईल. शहरात चार हजारांपेक्षा अधिक गृहनिर्माण संस्था आहेत. कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी त्याने मतदारनोंदणी करणे आवश्यक आहे. महापालिकेने सहा क्षेत्रीय कार्यालये, मतदारनोंदणी अधिकाऱ्यांचे कार्यालये व चौदा महाविद्यालयांत मतदारनोंदणी केंद्र सुरू केले आहे. ’’(प्रतिनिधी)बैठकीस विविध पक्षांच्या शहराध्यक्षांशिवाय अन्य कार्यकर्त्यांची संख्या अधिक होती. तसेच महापौर, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांना आणि काही अधिकाऱ्यांनाही या बैठकीची माहिती दिली नव्हती. तसेच काही पदाधिकारी या बैठकीस गेले असताना बसण्यासाठी जागा न मिळाल्याने बैठकीतून बाहेर पडले. याबाबत मंगला कदम म्हणाल्या, ‘‘बैठकीस राजकीय पक्षांच्या शहरप्रमुखांशिवाय अन्य लोक अधिक होते. महापौर, पक्षनेत्यांना या बैठकीची माहिती दिली नाही. ही चुकीची बाब आहे.’’