शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या...' रुपाली पाटलांची खोचक टीका, नमाजपठण प्रकरणात महायुतीत वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:03 IST2025-10-20T18:01:41+5:302025-10-20T18:03:03+5:30

मेधा कुलकर्णी यांना बोलायला त्यांच्याच पक्षातील लोक सुद्धा घाबरतात, असा दावा रुपाली पाटील यांनी केला आहे

Rupali Patil's harsh criticism of Shaniwarwada Medha Kulkarni..., controversy in the Mahayuti over the Namaz-reading issue | शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या...' रुपाली पाटलांची खोचक टीका, नमाजपठण प्रकरणात महायुतीत वाद

शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या...' रुपाली पाटलांची खोचक टीका, नमाजपठण प्रकरणात महायुतीत वाद

पुणे : पुण्यातील शनिवारवाडा नमाजपठण प्रकरणात आता महायुतीतच वाद सुरु झाल्याचे दिसून आले आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात आता अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत शनिवारवाड्यावर आंदोलन केले आहे. त्यांनी मेधा कुलकर्णींना टार्गेट करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

रुपाली पाटील म्हणाल्या, आमचा संघर्ष भाजपशी नाही. शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही. जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुलकर्णींवर गुन्हा दाखल व्हावा. मेधा कुलकर्णी यांच्यासोबत मी महापालिकेत २०१२ ते २०१७ दरम्यान एकत्र काम केले. त्या शिक्षिका आहेत. पण तेवढी अक्कल नसल्याची खोचक टीका पाटील यांनी यावेळी केली आहे. त्यांना बोलायला त्यांच्या पक्षातील लोक सुद्धा घाबरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पुण्यातील हिंदु मुस्लिम तेढ निर्माण करणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर तेढ निर्माण करणे, सामाजिक शांतता भंग करणे गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि हो मी हिंदू आहे आणि गर्वसे म्हणतो आम्ही हिंदू आहे. पण धर्मा धर्मात तेढ, भेद निर्माण करणारे ,सामाजिक शांतता भंग करणे हिंदू नक्कीच नाही. 

या घटनेनंतर काल शहरात मोठी खळबळ उडाली होती. विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पतित पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार वाड्यात आंदोलन केलं. संघटनेने सांगितलं की, त्यांनी त्या जागेवर गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केली तसेच शेणाने सारवून जागा शुद्ध करण्याचा विधीही पार पाडला. यानंतर शनिवारवाड्यात ‘शिववंदना’ सादर करण्यात आली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या घटना भविष्यात सहन केल्या जाणार नाहीत.  

खासदार मेधा कुलकर्णी यांनीसुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “यापुढे अशा प्रकारचे प्रकार काहीही झालं तरी आम्ही खपवून घेणार नाही.” त्यांनी प्रशासनाला अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी काल शनिवारवाडा येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. त्यानंतर शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारवाडा ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची वास्तू आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याकडून रात्री तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.

Web Title : शनिवार वाड़ा नमाज विवाद: महायुति में मतभेद, कुलकर्णी पर पाटिल का निशाना

Web Summary : शनिवार वाड़ा नमाज की घटना पर रूपाली पाटिल ने मेधा कुलकर्णी की आलोचना की, जिससे महायुति गठबंधन में मतभेद हो गया। पाटिल ने कुलकर्णी पर हिंदू-मुस्लिम तनाव भड़काने का आरोप लगाया और कार्रवाई की मांग की। हिंदू संगठनों ने विरोध प्रदर्शन किया, जबकि कुलकर्णी ने नमाज की निंदा की और सख्त उपायों का आह्वान किया।

Web Title : Saturday Wada Namaz Row: Mahayuti Discord, Kulkarni Targeted by Patil

Web Summary : Rupali Patil criticized Medha Kulkarni over the Saturday Wada namaz incident, sparking discord within the Mahayuti coalition. Patil accused Kulkarni of inciting Hindu-Muslim tensions, demanding action. Hindu organizations protested, while Kulkarni condemned the namaz and called for strict measures.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.