कागदावर मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला; रुबीच्या निवासी युवा डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:26 IST2025-06-11T17:25:50+5:302025-06-11T17:26:07+5:30

आत्महत्या करण्यापूर्वी एका कागदावर आपल्या मोबाइलचा पासवर्ड लिहून ठेवलेला आढळून आल्याने या आत्महत्येचे गूढ कायम असून, याबाबत शंका उपस्थित होत आहे

Ruby's young resident doctor took extreme step by writing down mobile password on paper | कागदावर मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला; रुबीच्या निवासी युवा डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल

कागदावर मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला; रुबीच्या निवासी युवा डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल

लष्कर : पुण्यातील सुप्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर श्याम व्होरा (वय २८) यांनी राहत असलेल्या डॉक्टर्स हॉस्टेलच्या खोलीत फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

रुबी हॉल क्लिनिकची जवळच ३०० मीटर अंतरावर ढोले पाटील चौकात दामोदर भवन ही इमारत आहे. या इमारतीत डॉक्टरांचे हॉस्टेल आहे. ज्यात जवळपास ८० ते १०० डॉक्टर राहतात. रूमचा दरवाजा खूप वेळ बंद असल्याने सुरक्षारक्षकाने तो तोडला. यानंतर डॉ. श्याम व्होरा यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नव्हते. दरम्यान, त्यांचे नातेवाईक गुजरातहून निघाले असून, ‘आमच्या परवानगीशिवाय काहीच करू नका’ असे त्यांनी पोलिसांना सांगितले. यामुळे डॉ. व्होरा यांचे पार्थिव रुबी रुग्णालयातच ठेवण्यात आले होते.

कागदावर लिहून ठेवला मोबाइलचा पासवर्ड 

डॉ. श्याम ओरा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका कागदावर आपल्या मोबाइलचा पासवर्ड लिहून ठेवलेला आढळून आला. यामुळे या आत्महत्येचे गूढ कायम असून, याबाबत शंका उपस्थित होत आहे. याबाबत कोरेगाव पार्क पोलिसांशी संपर्क झालेला नाही. डॉ. व्होरा हे रुबी रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून रेडिओलॉजी डायग्नोसिस विभागात निवासी वैद्यकीय डॉक्टर म्हणून कार्यरत होते. ते मूळचे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती समजते.

Web Title: Ruby's young resident doctor took extreme step by writing down mobile password on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.