Pranjal Khewalkar: रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरची यांची रेव्ह पार्टी नाही, तर सिक्रेट पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:04 IST2025-07-28T13:03:45+5:302025-07-28T13:04:13+5:30

सोशल मीडियावर या ड्रग्ज पार्टीला रेव्ह पार्टी म्हटले जात आहे. मुळात ही रेव्ह पार्टी नसून या पार्टीला सिक्रेट पार्टी असे म्हटले जाते.

Rohini Khadse's husband Pranjal Khewalkar's party is not a rave party, but a secret party | Pranjal Khewalkar: रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरची यांची रेव्ह पार्टी नाही, तर सिक्रेट पार्टी

Pranjal Khewalkar: रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरची यांची रेव्ह पार्टी नाही, तर सिक्रेट पार्टी

पुणे: रविवारी पहाटे पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडीतील स्टे बर्ड हॉटेलवर छापा मारून ड्रग्ज पार्टी करणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेत अटक केली. यामध्ये रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हा या पार्टीचा आयोजक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सोशल मीडियावर या ड्रग्ज पार्टीला रेव्ह पार्टी म्हटले जात आहे. मुळात ही रेव्ह पार्टी नसून या पार्टीला सिक्रेट पार्टी असे म्हटले जाते.

रविवारी स्टे बर्ड येथे येण्यापूर्वी सातही जण शहरातील एका पबमध्ये मध्यरात्री दीडपर्यंत पार्टी करत होते. पब बंद झाल्यावर ते एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये गेले. तेथे पार्टी करून सातही आरोपी स्टे बर्ड येथे प्रांजल खेवलकरच्या नावाने बुक असलेल्या रूममध्ये गेले. तेथे पुन्हा त्यांनी पार्टीला सुरुवात केली. साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी तेथे जात कारवाई केली.

रेव्ह पार्टी म्हणजे काय ?

रेव्ह पार्टी म्हणजे एक विशेष प्रकारची पार्टी आयोजित केली जाते. त्यामध्ये सामान्यतः जोरदार संगीत, नृत्य, दिवसभर किंवा संध्याकाळपासून सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत (कधी कधी पहाटेपर्यंत) पार्टी चालते. अशा पार्टीत डीजे इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक, ट्रान्स, टेक्नो इत्यादी प्रकारचे संगीत वाजवले जाते. या पार्टीचे आयोजन सहसा मोकळ्या जागेत, जंगलात, समुद्रकिनारी किंवा फार्म हाऊसवर केले जाते. ४ मार्च २००७ साली तत्कालीन पोलिस अधीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील शेतात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून २८७ तरुण-तरुणींना अटक केली होती. त्यानंतर एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रुझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर कारवाई करत अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनसह ८ जणांना अटक केली होती.

सिक्रेट पार्टी म्हणजे काय?

प्रांजल खेवलकर यांनी आयोजित केलेल्या ड्रग्ज पार्टीला सिक्रेट पार्टी असे म्हटले जाते. नियमित भेटणारे काही लोक एकत्र येऊन एखाद्या घरात, हॉटेलमध्ये दारू, बिअर अथवा अमली पदार्थांचे सेवन करतात.

Web Title: Rohini Khadse's husband Pranjal Khewalkar's party is not a rave party, but a secret party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.