रस्त्यावर गाडी आडवी लावून लुटले; CCTV फुटेज आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:12 IST2025-02-11T13:11:11+5:302025-02-11T13:12:19+5:30
वेळी दोघांनी त्यांची कार अडवली आणि खिशातील रोख रक्कम हिसकावून नेली.

रस्त्यावर गाडी आडवी लावून लुटले; CCTV फुटेज आले समोर
- किरण शिंदे
पुणे - माई मंगेशकर रुग्णालयाजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी गाडी आडवी लावून एका नागरिकाला लुबाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निरंजन माने (वय 53) असे लुटले गेलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते गणपती माथ्यावरून दर्शन घेऊन घरी परतत होते. याच वेळी दोघांनी त्यांची कार अडवली आणि खिशातील रोख रक्कम हिसकावून नेली.
ही घटना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. मात्र, सर्वात संतापजनक बाब म्हणजे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या निरंजन माने यांना पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली. "ड्युटी बदलण्याची वेळ झाली आहे, उद्या या असे सांगत तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.
दरम्यान, या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून, यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा निष्काळजीपणा आणि शहरातील वाढता गुन्हेगारीचा धोका लक्षात घेता प्रशासन यावर काय कारवाई करणार? हा मोठा प्रश्न आहे.