शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

रस्ते, तलावातील गाळ काढण्याची कामे तातडीने करावी : सुप्रिया सुळे यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 7:55 PM

गेल्या दोन महिन्यात सुळेंची दुसऱ्यांदा पीएमआरडीएला भेट

ठळक मुद्देपीएमआरडीए आयुक्त विक्रम कुमार यांची शुक्रवारी भेट; अधिकाऱ्यांशी केली चर्चाभोर-वेल्ह्यातील विद्युतीकरणाची कामे मार्गी लावा सूस ते नांदे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी

पुणे : दौंड, वेल्हा, मुळशी तालुका आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित रस्त्यांची कामे, घरकुल योजना, तलावातील गाळ काढणे अशी विविध कामे तातडीने मार्गी लावावी यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त विक्रम कुमार यांची शुक्रवारी भेट घेतली. महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर खासदार सुळे सातत्याने विविध विभागातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन मतदारसंघातील कामे मार्गी लावण्याची विनंती करीत आहेत. गेल्या दोन महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा पीएमआरडीएला भेट दिली. सिंचन विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी देखील ते संवाद साधत आहेत. पीएमआरडीए मार्फत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेसाठी अनेक नागरिकांनी अर्ज केले आहेत. अधिकाधिक नागरिकांना या योजनेत सहभागी करुन घेण्याची त्यांनी विनंती केली. दौंड तालुक्यातील. वरवंड येथे अंडर पास करावा, सहजपूर व खुटबाव येथे रेल्वे लाईनवर उड्डाणपूल उभारणी, व्हिक्टोरिया तलावातील गाळ काढणे, वरवंडमधील दिवेकर वस्ती, शेरीचा मळा, भांडगाव-केडगाव शिव रस्ता अशा विविध रस्त्यांची कामे करण्याची मागणीही त्यांनी केली. खडकवासला विधानसभा मतदार संघातील खेड शिवापूर ते कुसगाव खिंड मार्गे नवीन रस्ता तयार करणे,रहाटवडे ते रांझे, अभिनव महाविद्यालय ते वाल्हेकरवाडी, नऱ्हे मानाजीनगर, कोंढवे-कोपरे गावासाठी जोडणारे साकव करणे, धायरी ते कात्रज रस्ता आणि ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची कामे मार्गी लावण्याची सूचनाही खासदार सुळे यांनी केली. मुळशी तालुक्यातील भूकुम आणि भूगावातील वसती भागात टेमघर धरणातील योजनांमधून पाणी पुरवठा करावा. भूगाव येथे पाझर तलाव ते रामनदी भुयारी गटर योजना आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याची मागणी करण्यात आली. सूस ते नांदे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. वेल्हा तालुक्यातील कोंढवली फाट्यापासून कोंढवली पर्यंत (२.५ कि.मी.) रस्ता करावा, ग्रामपंचायत होळकरवाडी येथे गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी ५ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी सुळे यांनी केली. -----------------

भोर-वेल्ह्यातील विद्युतीकरणाची कामे मार्गी लावा भाटघर धरण पाणलोटक्षेत्रात १३२/११ केव्ही उपकेंद्र आहे. पावसाळ्यात हे उपकेंद्र पाण्यात बुडाले होते. त्यामुळे भोर तालुक्यातील १६० गावे ७ दिवस अंधारात होती. त्यामुळे हे केंद्र भाटघर धरणाशेजारील जलसंपदा विभागाच्या जागेत नव्याने बांधण्यात यावे. वेल्हे तालुक्यातील मौजे टेकपोळे येथील खानू, हिरडी, दांडवस्ती, पुरताड वस्ती, आंबेदांडवस्ती येथे विद्युत सुविधा उपलब्ध करुन द्यावी, मुळशी तालुक्यातील कोंढूर, केळांबे, कोकरे विद्युतीकरण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPMRDAपीएमआरडीए