शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते खोदाईची कामे संथगतीने

By admin | Updated: May 9, 2017 03:21 IST

तीर्थक्षेत्र आळंदीत जणू काही रस्ते खोदाईची स्पर्धाच सुरू असल्याचा अनुभव माऊलीभक्तांना येत आहे. शहरातील रस्त्यांची

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदीत जणू काही रस्ते खोदाईची स्पर्धाच सुरू असल्याचा अनुभव माऊलीभक्तांना येत आहे. शहरातील रस्त्यांची तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने काँक्रिटीकरण करण्याची कामे सुरू आहेत. परंतु ही कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याने अलंकापुरीत वाहतुकीचा बोजवारा उडू लागला आहे. अवघ्या सव्वा महिन्यावर आषाढी पायी वारी येऊन ठेपल्याने महिन्याच्या कालावधीत ही कामे पूर्णत्वास येतात की नाही, हाही गंभीर प्रश्न समोर येऊ लागला आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून शहराला जोडणाऱ्या वडगाव, मरकळ, चाकण, केळगाव, भोसरी आदी रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यांचे नव्याने मजबुतीकरणाचे काम मार्गी लावण्याची मागणी नागरिक सुमारे तीन वर्षांपासून प्रशासनाकडे करत होते. अखेर या वर्षी प्रशासनाने शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत रस्त्यांची कामे हाती घेऊन काँक्रिटीकरणास सुरुवात केली आहेत. त्यामुळे नागरिकांची तसेच भाविकांची अनेक वर्षांपासूनची रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा पूर्ण होत आहे. चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गाकडून वडगावमार्गे चऱ्होली खुर्द हद्दीतून शहराला जोडणाऱ्या दीड किमी अंतराच्या दुहेरी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. तर चाकण बाजूकडून केळगावमार्गे सुरू असलेले काम गेल्या आठ दिवसांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. त्यातच मरकळ बाजूने शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचे काम हाती घेतल्याने मागील अर्धवट अवस्थेत राहिलेल्या कामांना दुरुस्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील बहुतांशी सर्वच रस्त्यांची खोदाई करून कामे संथ गतीने सुरू आहेत. परिणामी प्रवासादरम्यान वाहनांना अडथळा निर्माण होऊन विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.(वार्ताहर)