रस्त्याचा वाद; एकाचा खून

By Admin | Updated: May 26, 2014 05:23 IST2014-05-26T05:23:51+5:302014-05-26T05:23:51+5:30

मळद (ता. दौंड) येथे रस्त्याच्या वादावरून दादासाहेब शेलार (वय ४५, रा. शेलारमळा, मळद, ता. दौंड) यांचा रात्री १ वाजण्याच्या सुमारास खून करण्यात आला

Road dispute Blood of one | रस्त्याचा वाद; एकाचा खून

रस्त्याचा वाद; एकाचा खून

कुरकुंभ: मळद (ता. दौंड) येथे रस्त्याच्या वादावरून दादासाहेब शेलार (वय ४५, रा. शेलारमळा, मळद, ता. दौंड) यांचा रात्री १ वाजण्याच्या सुमारास खून करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली. या प्रकरणी भगवान शेलार, सोमनाथ शेलार, पोपट शेलार, सुरेश शेलार, सागर शेलार, राहुल शेलार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि दादासाहेब शेलार यांच्यात गेल्या दीड महिन्यापूर्वी रस्त्याच्या वादावरून भांडण झाले होते. याचा राग मनात ठेऊन आरोपींनी दादासाहेब शेलार यांना गाठले. (वार्ताहर)

Web Title: Road dispute Blood of one