शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यामध्ये दम्याचा त्रास वाढण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

पावसाळ्यात सुरुवातीला ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे हवा अशुद्ध असल्याने दम्याचा विकार डोके वर काढतो. दम्याचा त्रास सुरू झाला ...

पावसाळ्यात सुरुवातीला ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे हवा अशुद्ध असल्याने दम्याचा विकार डोके वर काढतो. दम्याचा त्रास सुरू झाला की श्वसननलिकेला सूज येते आणि ती आकुंचन पावते. कफ होण्याचे प्रमाण वाढते आणि श्वास घेण्यासही त्रास होतो. खोकल्याची उबळ येणे, दम लागणे, अस्वस्थ वाटणे, छाती कफाने भरून येणे अशी लक्षणे दिसू लागतात. लंग फंक्शन टेस्ट, छातीचा एक्स रे, स्टेथिस्कोपद्वारे तपासणी अशा विविध तपासण्यांमधून दम्याचे निदान करता येते. दम्याच्या रुग्णांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याने या रुग्णांनी कोरोना काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

--------------

पावसाळ्यात वातावरणातील ओलसरपणा, तसेच विषाणूच्या संसर्गामुळे दम्याच्या रुग्णांना अनेक प्रकारच्या अ‍ॅलर्जीचा त्रास होतो. सल्फर डायआॅक्साईड आणि नायट्रोजन डाय आॅक्साईड यासारखे विषारी वायू पावसाळ्यात हवेत मिसळल्याने दम्याच्या रुग्णांना योग्य प्रकारे श्वास घेण्यास अडचण येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी दम्याचा अॅटॅक प्राणघातक ठरू शकतो. तरुणांनाही हा दम्यांचा त्रास जाणवू शकतो. पावसाळ्यात सर्दी आणि फ्लूमुळे दम्याच्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच दम्याचा त्रास जाणवत असल्यास वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक औषधोपचार सुरू करणे आवश्यक आहे.

- डॉ. संजय नगरकर, जनरल फिजिशियन

-----------------------

दर वर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच दम्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. माॅन्सून सुरू झाल्यापासून 75 ते 80 नवीन रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या वाढत आहे. अतिथंड वातावरणामुळेही दम्याचा विकार सतावू शकतो. ज्यांना आधीपासूनच दम्याचा त्रास आहे अशा व्यक्ती बुरशी, धूळ आणि बॅक्टेरियाशी संपर्क आल्यास त्यांचा आजार बळावू शकतो. पावसाळ्यात विशेषत: दम्यांच्या रुग्णांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

- डॉ. विशाल मोरे, श्वसनविकारतज्ज्ञ

----------------

काय काळजी घ्यावी?

*आपल्या घरातील ओलसर भिंती, फर्निचर तपासून बघा.

* इतर खोल्यांमध्ये ओलावा येऊ नये म्हणून स्नानगृह आणि स्वयंपाकघर कोरडे ठेवा.

* घरात हवा खेळती ठेवण्याचा प्रयत्न करा.

* दम्याचा त्रास टाळण्यासाठी घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करा.

* पाळीव प्राण्यांमुळे दम्याची लक्षणे आणखी वाढण्याची शक्यता असते. त्यांना खोलीबाहेर ठेवा.

* श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा, पुरेशी विश्रांती घ्या.

* घरातील कार्पेट, बेडशीट आणि उशीचे कव्हर गरम पाण्याने धुवा.

* धूप स्टिक, डासांपासून बचाव करणारे कॉइल, परफ्युम आणि डिओडरंटचा वापर टाळा. * नियमित इन्हेलरचा वापर करा.

* रोगप्रतिकारशक्ती उत्तम करण्यासाठी नियमित पौष्टिक आहाराचे सेवन करावे. जंकफूड, मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन करणे शक्यतो टाळावे.