शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मिरवणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, गर्दीवर राहणार सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:59 IST

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून, साडेआठ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी रात्रंदिवस तैनात राहणार आहे.

पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला असून, साडेआठ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी रात्रंदिवस तैनात राहणार आहे. मिरवणुकीत होणाºया प्रत्येक बारीक हालचालींवर पोलिसांसह सीसीटीव्हीच्याही ‘तिसºया डोळ्याची’ नजर राहणार आहे. प्रत्येक मंडळात तीन वाद्यपथकांची मर्यादा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी दिली. गणेश विसर्जन मिरवणुकीला उद्या (मंगळवारी) सकाळी नऊपासून सुरुवात होणार आहे. बंदोबस्तात पोलीस आयुक्त, सहआयुक्त, चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, १६ उपायुक्त, ३३ सहायक आयुक्त, २०४ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ७ हजार ८७० पोलीस शिपायांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दल बंदोबस्तासाठी पोलिसांना मदत करणार आहे. बंदोबस्तासाठी पुण्याच्या बाहेरून ५ उपायुक्त, १२ सहायक आयुक्त, ६५ पोलीस निरीक्षक, ३० उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक, २२० होमगार्ड व ३ राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी मिळाल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीतील चोरीचे वाढते प्रकार पाहता मिरवणुकीत साध्या वेशातील पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला पोलिसांचे आणि गुन्हे शाखेचे पथक तयार आहे. प्रत्येक मंडळाला त्यांच्यासमोर तीन वाद्यपथके लावण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक पथकामध्ये २५ ढोल व ५ ताशांची मर्यादा घालून दिली आहे. डीजेच्या भिंती लावणाºया मंंडळांवर कारवाई केली जाणार आहे. मिरवणूक मार्गावर आवाज मोजण्यात येणार असून, आवाजाची मर्यादा ओलांडणाºयांवरही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, वाहतूक शाखेकडून स्वतंत्र बंदोबस्त दिला आहे. यामध्ये १ उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १०४ अधिकारी व १३९६ पोलिसांचा बंदोबस्तामध्ये राहणार आहेत. वाहतूक पोलिसांना पाचशे स्वयंसेवक बंदोबस्तामध्ये मदत करणार आहेत.महापालिकेची व्यवस्था : सर्व घाटांवर बसवले आहेत कॅमेरे-विसर्जनासाठी घाटांवर येणाºया गर्दीवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहरातील १७ घाटांवर एकूण ५७ ठिकाणी महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केली असून या सर्व ठिकाणच्या गर्दीवर सीसीटीव्हीची नजर असेल. महापालिकेची कर्मचारी तसेच पोलीसही या कॅमेºयांचे मॉनिटरिंग करणार असून अनुचित गोष्ट निदर्शनास आल्यानंतर लगेचच त्याची दखल घेण्यात येईल.विसर्जनासाठी सर्वच घाटांवर गर्दी होत असते. अग्निशमन दलाच्या वतीने त्यांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आता या जवानांबरोबर सीसीटीव्ही कॅमेरेही असतील. प्रत्येक घाटावर तीन किंवा चार कॅमेरे असतील. सर्व कोनांमधून ते गर्दीचे चित्रण करतील.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनPuneपुणेPoliceपोलिस