शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

केळद खिंडीजवळ दरड कोसळली

By admin | Updated: July 9, 2015 02:08 IST

वेल्ह्याहून, पासलीहून केळदला जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणच्या केळद खिंडीजवळ सायंकाळी ५.२० च्या सुमारास दरड कोसळली.

कापूरव्होळ : वेल्ह्याहून, पासलीहून केळदला जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणच्या केळद खिंडीजवळ सायंकाळी ५.२० च्या सुमारास दरड कोसळली. या दरडीमुळे पासली परिसर व केळद पंचक्रोशी परिसरातील असणाऱ्या १६ गावांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. आज सकाळच्या शाळा असल्याने विद्यार्थी तसेच पालक बचावले. आज दुपारी वेल्ह्यातील पर्यटनक्षेत्र असलेल्या मढी घाटात निघालेले प्रवासी यातून बचावले. वेल्ह्यातून बाजार व साहित्य घेऊन केळद व त्याहून पुढे असणाऱ्या गावातील लोक आज सायंकाळी ६ वाजता वेल्ह्यातून घरी परतत असताना, या दरडीमुळे त्यांना घरी जाता आले नाही. सिंगापूरला जाण्यासाठी नवीन रस्ता तयार केलेला असून, या रस्त्याचे मोठमोठाले दगड, माती, मुरूम या खिंडीच्या रस्त्याच्या लगत बेजबाबदारपणे टाकून पावसाळ्यात काय होईल, याचा विचार केला नाही. वेल्ह्यात आज दिवसभर प्रचंड मुसळधार पावसामुळे या खिंडीच्या लगतचे दगड, माती, मुरूम रस्त्यावर येऊन उकरलेले दगड, रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. याबाबत वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ते म्हणाले, की या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्तासाठी पाठवून जेसीबीच्या साह्याने हा रस्ता पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे. (वार्ताहर)