दरवाढ लागू केल्यावर कोटींचे उत्पन्न; आता पीएमपी बस वेळेवर सोडा अन् प्रवासी वाढवा, अध्यक्षांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:31 IST2025-06-04T10:31:01+5:302025-06-04T10:31:09+5:30

‘पीएमपी’कडून नुकतेच तिकीट दर वाढवल्याने उत्पन्नदेखील वाढत आहे, त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होऊ नये याची दक्षता घ्या

Revenue of crores after implementing fare hike; Now PMP buses should leave on time and increase passengers, instructions from the chairman | दरवाढ लागू केल्यावर कोटींचे उत्पन्न; आता पीएमपी बस वेळेवर सोडा अन् प्रवासी वाढवा, अध्यक्षांच्या सूचना

दरवाढ लागू केल्यावर कोटींचे उत्पन्न; आता पीएमपी बस वेळेवर सोडा अन् प्रवासी वाढवा, अध्यक्षांच्या सूचना

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपी) पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात प्रवाशांसाठी बससेवा पुरविण्यात येते. पीएमपीच्या बस संचलनामध्ये व प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सुधारित स्टेज रचनेनुसार तिकीट व विविध पासेसमध्ये दरवाढ लागू करण्यात आली आहे. या दरवाढीची अंमलबजावणी रविवार (दि. १) पासून करण्यात आली आहे. या पहिल्याच दिवशी पीएमपीला एक कोटी ९७ लाख १७ हजार ४३० रुपयांचे उत्पन्न मिळाले. उत्पन्न वाढल्यानंतर पीएमपी बस वेळेवर सोडा, प्रवासी वाढवा अशा सूचना  ‘पीएमपी’ च्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व आगारप्रमुखांना दिल्या आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडीच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते; परंतु वारंवार बस रस्त्यात बंद पडल्यामुळे फेऱ्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत थांबत पाहावी लागते. सर्व मार्गांवरील बसची वारंवारिता नियोजित वेळेत सुरू ठेवा  अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

‘पीएमपी’कडून नुकतेच तिकीट दर वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे उत्पन्नदेखील वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात यावी. बस मार्गावर सोडताना देखभाल-दुरुस्ती करून सोडावी. प्रवासी संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा. ब्रेकडाउनचे प्रमाण कमी करण्यात यावे. शिवाय जून महिन्यात प्रवासी संख्या १० लाखांवरून जवळपास १४ ते १५ लाख वाढविण्यावर भर देण्यात यावा. मार्गावरील बसचे योग्य नियोजनदेखील करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Revenue of crores after implementing fare hike; Now PMP buses should leave on time and increase passengers, instructions from the chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.