शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

इनामदार हॉस्पिटलवरील कारवाईस मज्जाव

By admin | Updated: March 11, 2015 01:09 IST

वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलने केलेले अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास पालिका प्रशासनाने नकार दिला आहे.

पुणे : वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलने केलेले अनधिकृत बांधकाम नियमित करण्यास पालिका प्रशासनाने नकार दिला आहे. त्यानंतर या बांधकामांना पालिकेने बजाविलेल्या नोटिशीनुसार, कारवाईचा निर्णय पालिकेने घ्यावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले असतानाही नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून हॉस्पिटलवर कारवाई करण्यास मज्जाव केला आहे. राज्यमंत्री असलेले भाजपचे रणजित पाटील यांनी आपले अधिकार वापरून स्थगिती दिल्याने सुशासनाचे हेच का ‘अच्छे दिन’? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, राज्यमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात दाद मागण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. पालिकेकडून सात मजल्यांची परवानगी घेऊन हॉस्पिटल प्रशासनाने येथे १२ मजले बांधले असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पालिकेने हॉस्पिटलच्या बेकायदा बांधकामाला नोटीस बजावून तातडीने ते काढून घ्यावे, असे सांगितले होते. तसेच, जागामालकानेच आरक्षण विकसित केल्याने महापालिकेबरोबर झालेल्या करारानुसार, दोन मजले पालिकेला द्यावेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर एकदा कारवाईसाठी गेलेले पथकही हात हलवत माघारी आले होते. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेऊन या कारवाईस स्थगिती मिळविली होती. गेल्या महिन्यात यावर सुनावणी घेताना बेकायदा बांधकामा बाबत पालिकेने निर्णय घ्यावा, तर राज्य सरकारने आर ७बाबत ६ महिन्यांत निर्णय घ्यावा, असा आदेश दिला. (प्रतिनिधी)