जीव वाचवण्यासाठी दगड उचलून प्रतिकार; कुत्र्यांच्या आक्रमक झुंडीपुढे निभाव लागला नाही, चाकणमध्ये महिलेचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 14:40 IST2026-03-16T14:40:45+5:302026-03-16T14:40:56+5:30

दहा ते बारा कुत्र्यांच्या टोळीने एकाच वेळी हल्ला केल्याने त्या पूर्णपणे घेरल्या गेल्या होत्या, जवळपास १५ मिनिटे हा प्रकार सुरु होता

Resisted by picking up stones to save her life; Unable to defend herself against an aggressive pack of dogs, woman dies on the spot in Chakan | जीव वाचवण्यासाठी दगड उचलून प्रतिकार; कुत्र्यांच्या आक्रमक झुंडीपुढे निभाव लागला नाही, चाकणमध्ये महिलेचा जागीच मृत्यू

जीव वाचवण्यासाठी दगड उचलून प्रतिकार; कुत्र्यांच्या आक्रमक झुंडीपुढे निभाव लागला नाही, चाकणमध्ये महिलेचा जागीच मृत्यू

चाकण : पुणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ३२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे–नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने महिलेवर हल्ला चढवून तिचा जागीच जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहा ते बारा कुत्र्यांच्या टोळीने एकाच वेळी हल्ला केल्याने त्या पूर्णपणे घेरल्या गेल्या. जीव वाचवण्यासाठी त्यांनी दगड उचलून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्यांच्या आक्रमक झुंडीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 शोभा विजय वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव असून त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी होत्या. सध्या त्या चाकण परिसरात वास्तव्यास होत्या. सोमवारी (दि. १६) मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने त्यांच्यावर हल्ला केला.

अंगाचे लचके तोडले 

कुत्र्यांनी त्यांच्या हात, पाय, चेहरा आणि मानेवर गंभीर चावे घेतले. कपडे फाडून अंगाचे अक्षरशः लचके तोडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जवळपास १५ मिनिटे हा भीषण प्रकार सुरू होता. अतिरक्तस्त्राव आणि तीव्र जखमांमुळे शोभा वाघमारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

सकाळी मृतदेह आढळला 

मंगळवारी सकाळी परिसरातील नागरिकांना विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. सुरुवातीला हा अत्याचार किंवा खुनाचा प्रकार असावा अशी चर्चा सुरू होती. मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

नागरिकांमध्ये भीती 

चाकण शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. काही नागरिकांनी ही कुत्री सामान्य नसून लांडगा आणि कुत्रा यांच्या संकरित प्रजातीची असावीत, असा संशयही व्यक्त केला आहे. या घटनेनंतर नागरिक, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
प्रशासनाकडे कारवाईची मागणी 

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेक घटना घडल्या आहेत.मागील महिन्यात मार्केटयार्ड परिसरात एका भटक्या कुत्र्याने तब्बल पंचवीस ते तीस जणांना चावे घेतले होते.परंतु आजच्या भीषण घटनेनंतर चाकण परिसरातील भटक्या कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण मिळवावे,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे.

 

Web Title : चाकण में कुत्तों के हमले में महिला की मौत; कार्रवाई की मांग।

Web Summary : चाकण, भारत में, एक 32 वर्षीय महिला की आवारा कुत्तों के झुंड के हमले में मौत हो गई। जवाबी कार्रवाई के बावजूद, उसने गंभीर चोटों के कारण दम तोड़ दिया। स्थानीय लोग आवारा कुत्तों की आबादी को नियंत्रित करने के लिए तत्काल कार्रवाई की मांग कर रहे हैं।

Web Title : Woman dies in dog attack in Chakan; locals demand action.

Web Summary : In Chakan, India, a 32-year-old woman died after being attacked by a pack of stray dogs. Despite fighting back, she succumbed to severe injuries. Locals are demanding immediate action to control the stray dog population.