शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

राजीनामानाट्य रंगले

By admin | Updated: January 10, 2015 00:59 IST

सभापती, उपसभापतींची एक वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने त्या पदावर संधी मिळावी, यासाठी आतुर झालेल्या इच्छुकांकडून त्यांचे राजीनामे घेण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब होऊ लागला आहे.

पिंपरी : शिक्षण मंडळ सभापती, उपसभापतींची एक वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने त्या पदावर संधी मिळावी, यासाठी आतुर झालेल्या इच्छुकांकडून त्यांचे राजीनामे घेण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब होऊ लागला आहे. सभापती, उपसभापतींनी अखेर राजीनामे दिले, अशी चर्चा शहरात पसरली असताना, पक्षनेत्या मंगला कदम यांनी मात्र आपल्याकडे कोणीच अद्याप राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले.शिक्षण मंडळाचे सभापती फजल शेख आणि उपसभापती सविता खुळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. अशी चर्चा दुपारपासून महापालिका वर्तुळात रंगली. प्रत्यक्षात पक्षनेत्यांकडे कोणीच राजीनामा दिलेला नव्हता. उपसभापती सविता खुळे यांचे राजीनामा पत्र घेऊन शिक्षण मंडळाचे काही सदस्य पक्षनेत्यांच्या कक्षात गेले. परंतू चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास त्या निघून गेल्या असल्याने खुळे यांचे राजीनामा पत्र सदस्यांकडेच राहिले. सभापती शेख यांनीही राजीनामा दिला असावा, अशी खुळे यांची समज झाली. परंतू त्यांनी चौकशी केली असता, शेख यांनी राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट झाले. शेख यांना विचारणा केली असता, अशा पद्धतीने हस्ते परहस्ते राजीनामा देता येत नाही. मागील आठवड्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देण्याबाबत सुचवले आहे. आपल्या कारकिर्दीत क्रीडा स्पर्धा व्हाव्यात. अशी आपली इच्छा असून स्पर्धा होताच राजीनामा देणार अशी भूमिका त्याच बैठकीत व्यक्त केली आहे. असे सभापती शेख यांनी नमूद केले. शुक्रवारी कोणीही पक्षनेत्यांकडे राजीनामे दिलेले नाहित. हे सर्वांशी चर्चा केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)४शिक्षण मंडळ सभापती, उपसभापतीपदाच्या राजीनाम्यासंदर्भात शिक्षणमंडळाचे कालपासून संपर्कात आहेत. ज्यांना राजीनामा द्यायचा आहे, त्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता यावे, असे सांगितले होते. परंतू तेव्हा कोणीही आले नाही. सायंकाळी ५ च्या सुमारास कार्यालयात काही सदस्य आले हे समजले. परंतू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वसाच्या उद्घाटनाला बाहेर पडल्याने त्यांची कोणाशी भेटच झाली नाही. त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर दुसऱ्या शनिवारी महापालिका कामकाज बंद असले तरीही उपस्थित राहण्याची तयारी आहे. त्यांनी राजीनामा देण्यासाठी यावे.