शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या मंदिर परिसर विकासासाठी बड्या कुटुंबाकडून विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचा खर्च किती असावा याचा विचार आम्ही केलेला नाही. मंदिराच्या आतील बाजूच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचा खर्च किती असावा याचा विचार आम्ही केलेला नाही. मंदिराच्या आतील बाजूच्या कामासाठी सुमारे ३०० ते ४०० कोटी खर्च होईल, असा माझा अंदाज आहे. मंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजे अकराशे कोटी रुपये लागू शकतील,” असा अंदाज श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी वर्तवला. अयोध्या परिसराच्या विकासासाठी एका ‘बड्या’ कुटुंबाने विचारणा केली होती. मात्र, हे नाव मी जाहीर करणार नाही, असे सांगून त्यांनी यासंदर्भात मौन पाळले.

येथे गुुरुवारी (दि. ३१) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशातील सामान्य व्यक्तीच्या दानातून हे मंदिर उभारले जावे, ही बाब सामान्य व्यक्तीच्या रामभक्तीच्या दृष्टीने समाधान देणारी आहे. मंदिरासाठी जनतेकडून दान स्वीकारण्याचा मूळ हेतू हाच आहे, असे स्वामी गोविंददेव यांनी सांगितले.

स्वामी गोविंददेव गिरी यांनी सांगितले, की अयोध्या मंदिरासाठी येत्या मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत (दि. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी) निधी संकलन केले जाणार आहे. यासाठी एक हजार रुपये, शंभर रुपये आणि दहा रुपयांची कुपन छापली आहे. एकूण ५०० कोटी रुपयांची ही कुपन छापलेली आहेत. या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांतील १० हजार गावांतील ५० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी दोन हजार संत आणि ५० हजारांहून अधिक स्वयंसेवक कार्य करणार आहेत.

मंदिरासाठी केंद्र सरकार निधी देणार नसून सर्वसामान्य नागरिकांकडून हा निधी गोळा केला जात आहे. परदेशी निधी घेण्याची परवानगी सध्या नाही. ती मिळाल्यास परदेशातील भक्तांचा निधी स्वीकारला जाईल. या अभियानातून अंदाजे हजार ते अकराशे कोटी रुपयांचा निधी जमा होण्याचा अंदाज स्वामी गोविंददेव गिरी यांनी वर्तविला. विश्व हिंदू परिषदेचे मुंबई प्रदेश मंत्री शंकर गायकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे , प्रांत अभियान सहप्रमुख मिलिंद देशपांडे, शहर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर या वेळी उपस्थित होते.