शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे भाडे थकले

By admin | Updated: June 9, 2014 04:46 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव (ता. आंबेगाव) अंतर्गत काटेपुरम चौक, पिंंपळे गुरव येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सुरू आहे

पिंंपळे गुरव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव (ता. आंबेगाव) अंतर्गत काटेपुरम चौक, पिंंपळे गुरव येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सुरूआहे. या वसतिगृहाची इमारत भाड्याने असून, २२ महिन्यांपासून भाडे रखडले आहे. वर्षभरापासून मागणी करूनही भाडे न मिळाल्याने इमारतीच्या मालकाने इमारत मोकळी करण्याची नोटीस दिली आहे. जागामालक बळीराम आनंदराव घोडके यांनी गांगर्डेनगर, प्रज्वल हाइट्स येथील ७४९.५५ चौरस मीटर जागा आदिवासी मुलींच्या वसतिगृहासाठी ८० हजार ६०७ रुपये भाड्याने तीन वर्षांच्या कराराने दिली आहे. या वसतिगृहामध्ये पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील १२५ मुलींचे वास्तव्य आहे. सन २०१२ पर्यंतचे घोडके यांना पूर्णत: भाडे मिळाले. मात्र २०१२ ते २०१५ या तीन वर्षांच्या नवीन करारानुसार १७ लाख ७३ हजार ३५४ रुपये भाडे रखडले आहे. ठाणे विभागाचे अप्पर आयुक्त सुधीर पाटील, आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्यासह पत्रव्यवहार क रून भाडे मिळण्याची विनंती केली. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत जागामालक घोडके अप्पर आयुक्त सुधीर पाटील यांना भेटण्यास आठ वेळा गेले. मात्र ५ वेळा भेट नाकारली. ११ मार्चच्या भेटीमध्ये धमकी देऊन तुम्हाला भाडे मिळू देणार नाही; न्यायालयात जा, आयुक्तांकडे जा, आदिवासी मंत्र्याकडे जा, वसतिगृह खाली करण्यासाठी नोटीस दे, उलट मी तुझ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, असे धमकाविले.