शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने रोजगार हिरावलेल्यांना रोजगार हमी योजनेचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

पुणे : कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊन दरम्यान अनेकांचे रोजगार गेले. या बेरोजगारांना जिल्ह्यात रोजगार हमी योजनांच्या कामांनी दिलासा दिला ...

पुणे : कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊन दरम्यान अनेकांचे रोजगार गेले. या बेरोजगारांना जिल्ह्यात रोजगार हमी योजनांच्या कामांनी दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील मजुरांबरोबर इतर जिल्ह्यातील मजुरांनाही या अंतर्गत रोजगार मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात ७८४ रोहयोची कामे सुरू असून त्या अंतर्गत ४ हजार २६३ मजुरांना काम मिळाले आहे.

कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊनचा फटका सर्वाधिक असंघटीत कामगारांना बसला. कामे, तसेच उद्योग बंद झाल्याने अनेक मजूर परगावी परतले. यात परराज्यातील मजुरांचाही समावेश आहे. मोठ्या प्रमाणात बेरोजगार झालेल्यांना पुन्हा काम मिळावे या हेतुने जिल्हा परिषदेने रोहयोची कामे पुन्हा सुरू करत ग्रामपंचायतींना या मजुरांना या अंतगर्गत काम देण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच या वर्षी परराज्यातील मजुरांनाही या योजने अंतर्गत काम देण्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सूचना केल्या होत्या.

पानंद रस्यांची कामे, अंतर्गत रस्यांची कामे, पाणी योजनांची कामे ग्रामपंचायती अंतर्गत सुरू आहेत. यावर रोहयो अंतर्गत मजुरांना कामे दिली गेली आहे. दिवसाला साधारण २०० ते २२५ रुपये मोबदला कामाचा दिला जात आहे. या वर्षी जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोडणी कामगारांनाही रोहयोमुळे रोजगार मिळाला आहे.

--------

तीन वर्षे किसानसभा कामासाठी लढा देत होती, तेव्हा कुठे पहिल्यांदा यावर्षी हाताला काम मिळाले. बोरघर परिसरातील १७० लोकांची रोजगारासाठी मागणी होती, यापैकी सुरू असलेल्या उंबरवाडी, घोडवाडी, काळेवाडी या रस्त्याच्या कामावर सध्या ५५ लोक काम करत आहेत. एकदम चांगले काम सुरू असून मागील दोन आठवड्यांचे काम पाहिले असताना साधारण २०० ते २२५ रुपये रोज पडला आहे.

- राजू घोडे, रोहयो कर्मचारी

------

दरवर्षी भात कापणी व झोडणी झाल्यानंतर हाताला काम मिळत नव्हते. परंतु यावर्षी काम मिळाल्याने गाव सोडून बाहेर गावी कामावर जाण्याची वेळ आली नाही. ग्रामस्थांनी रस्ते, तलाव व विहिरीतील गाळ काढणे, भात शेती दुरूस्ती अशी अनेक कामे सुचवली आहेत, ही सर्व कामे मिळाल्यास वर्षभर पुरेल एवढे काम गावात मिळेल.

- दीपक वालकोळी, रोहयो कर्मचारी

--------

परराज्यातील कर्मचाऱ्यांना रोहयोग समाविष्ट करण्यासाठी केल्या सूचना

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. यात परराज्यातील मजुरांचा मोठा समावेश होता. या सोबतच परजिल्ह्यातील मजुरांची संख्याही जास्त होती. यामुळे ज्या ठिकाणी आैद्योगिक वसाहत आहे, येथील ग्रामपंचायतींना अशा मजुरांना रोहयो अंतर्गत काम देण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्ह्यात ग्रामपंचायतींद्वारे अशी कामे सुरू असून मजुरांना हक्काचा रोजगार मिळाला आहे.

आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद