शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पिकांना दिलासा

By admin | Updated: October 28, 2015 01:11 IST

खेडच्या पूर्व, तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात परतीच्या वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पेरणीयुक्त हरभरा, ज्वारी पिकांना दिलासा मिळाला आहे

शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व, तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात परतीच्या वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पेरणीयुक्त हरभरा, ज्वारी पिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे कांदापिकाचेही सिंचन होण्यास मदत होणार आहे. मात्र, हवामानात बदल झाल्याने याचा परिणाम पिकांवर होत आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने हातची पिके जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल घडून कमालीची उष्णता तयार होऊन, पावसासारखी परिस्थिती निर्माण होत होती. सोमवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे वळवाच्या पावसाची चाहूल लागली होती. अखेर रात्री एक ते दीडच्या सुमारास पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या ढगांमधून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हळूवार कोसळणारा वरुणराजा अल्प कालावधीतच जोरात सुरू झाला. सुमारे एक तास पडलेल्या वळवाच्या पावसाने चौफुला, वाजेवाडी, मांजरेवाडी, साबळेवाडी, मोहितेवाडी, बहुळ, सिद्धेगव्हाण, नवीनगाव, चिंचोशी आदी परिसरातील शेतांमध्ये पाणीच पाणी केले.चालू पावसाळी हंगामात वरुणराजाची बरसण्यास दीर्घ प्रतीक्षा करायला लावली होती. मात्र, उशिरा का होईना, परंतु मुबलक प्रमाणात पावसाची कृपा झाल्याने पाण्याचे स्रोत गच्च भरून खळखळू लागले आहेत.परिणामी, पाण्याची चिंता दूर होऊन रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. ईशान्य मोसमी पावसाच्या शिडकाव्याने पावसाळी हंगामात चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सुखद धक्का देऊन धरणीमातेचीही तृष्णा भागविल्याने रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू, ज्वारी ही महत्त्वाची पिके यशस्वीरीत्या उत्पादित करण्याच्या आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. (वार्ताहर)