वाहन निरीक्षक पदासाठी 'लायसन्स अनिवार्य' हा नियम शिथिल करा; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 06:42 PM2021-09-14T18:42:35+5:302021-09-14T18:42:45+5:30

मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी येतीये अडचण; शिकाऊ परवाना ग्राहय धरावा

Relax the 'license mandatory' rule for the post of vehicle inspector; Demand for MPSC students | वाहन निरीक्षक पदासाठी 'लायसन्स अनिवार्य' हा नियम शिथिल करा; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी

वाहन निरीक्षक पदासाठी 'लायसन्स अनिवार्य' हा नियम शिथिल करा; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी

Next
ठळक मुद्देपूर्व परीक्षा पात्र ठरल्याने केवळ वाहन परवाना नसल्याने संधी हिरावू नये

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) सहायक मोटार वाहन निरीक्षक गट क  २०२० परीक्षा घेण्यात आली. या पदासाठी कायमी स्वरूपातील वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक असल्याचा नियम आहे. आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी या नियमाची पूर्तता आवश्यक आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे कायम स्वरूपी वाहन परवाना नाही. त्यामुळे त्यांना मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी या नियमात शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्याकडे केली आहे.

या पदाच्या मुख्य परीक्षेसाठी कायमस्वरूपी वाहन चालविण्यासाठी वैध अनुज्ञाप्ती (गिअर्स असलेली मोटार सायकल  व हलके मोटार वाहन) मागितली आहे. मात्र अनेकांकडे परवाना नसल्याने त्यांना मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळपास सर्वच वाहन प्रशिक्षण केंद्र बंद होती. तसेच अजूनही काही ठिकाणी बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परवाना काढता आला नाही. त्यामुळे या बाबींचा विचार करून केवळ परवान्यामुळे संधी हिसकून घेऊ नये. तसेच मुख्य परीक्षा दिल्यानंतर हा नियम लागू करण्यात यावा. अशी विनंती देखील विद्यार्थ्यांनी केली आहे.

या पदासाठी १७ जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. पूर्व परीक्षा १५ मार्च २०२० मध्ये रोजी घेण्यात आली. त्यांनतर तब्बल दिड वर्षांनी म्हणजे २४ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. आता कागदपत्रे ६ ते २० सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन कागदपत्रे सादर करून मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. मुख्या परीक्षा ३० ऑक्टोबर ला घेण्याचे घोषित करण्यात आले आहे. पूर्व परीक्षेतून २४० पदांसाठी ४४४४ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
   
 उपस्थित केलेले मुद्दे 

-एमपीएससी कडून ही परीक्षा तब्ब्ल चार वर्षांनी घेण्यात येत आहे

-कोविड १९ मुळे वाहन परवाना काढण्यास अडथळा

-पूर्व परीक्षा पात्र ठरल्याने केवळ वाहन परवाना नसल्याने संधी हिरावू नये

-मुख्य परीक्षेनंतर हा नियम ठेवण्यात यावा

-शिकाऊ परवाना ग्राहय धरावा

Web Title: Relax the 'license mandatory' rule for the post of vehicle inspector; Demand for MPSC students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.