शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

राज्यपालांना विमान परवानगी नाकारणं हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रुपणा : चंद्रकांत पाटलांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 2:20 PM

राज्य सरकारकडून सुडाचे, द्वेषाचे राजकारण सुरु आहे. मात्र, सामान्य जनता ही गोष्ट पाहत आहे.

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियोजित दौऱ्यानुसार आज उत्तराखंडसाठी रवाना होणार होते. पण सरकारी विमानात बसल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप त्यांच्या विमान प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचं कळालं. त्यामुळे त्यांना विमानातून खाली उतरावं लागलं आणि पुन्हा राजभवनात परतावं लागल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर विरोधी पक्षांकडून राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध टीकेची झोड उठविण्यात येत आहे. आता याच धर्तीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांना हवाई प्रवासाला परवानगी नाकारत विमानातून खाली उतरविणे हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रूपणा आहे अशा शब्दात ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील एका बैठकीला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, आधी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली. आता राज्यपालांना विभागले जात आहेत. हे छोट्या मनाचे लक्षण आहे. साधारण राज्यपालांच्या कुठल्याही प्रवासाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठ्वावी लागते. तसेच ही फाईल मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ मार्गी लावली जाते. पण राज्यपालांची ही फाईल क्लिअर केली गेली नाही. त्यामुळे त्यांना शासकीय विमातून उतरावे लागले. आणि व्यावसायिक विमानाने हा प्रवास करावा लागला. हे सर्व सुडाचे द्वेषाचे राजकारण सुरु आहे. सामान्य जनता ही गोष्ट पाहत आहे.

सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचे ट्विट देश अहिताचे आहे का? सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांनी केलेले ट्विट हे देश हिताचे होते की अहिताचे ? त्यांनी अन्य देशातल्या लोकांनी आमच्या देशांगांतर्गत प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज नाही यासंबंधी हे ट्विट केले. ते चुकीचे आहे का? त्याची चौकशी करणार आहे का? मुळात ते देश हिताचे बोलले पण त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. 

मुख्यमंत्र्यांनी एवढा एवढा अहंकार बाळगणे योग्य नाही : देवेंद्र फडणवीस

राज्यातील ठाकरे सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आहे. मात्र याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्याच दरम्यान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना संताप व्यक्त केला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात एवढे अहंकारी इगोइस्टिक सरकार कधी पहिले नाही असा हल्लाबोल केला आहे. 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार