शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

श्वानांपासूनच्या अपघातांवरची प्राणरक्षक ‘रिफ्लेक्टिव्ह कॉलर’.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 7:00 AM

शहर आणि महामार्ग रस्त्यांवरती श्वानांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे...

ठळक मुद्देअपघात रोखण्यास प्रभावी उपाय : तरुणाईचा स्तुत्य उपक्रम  लव्ह केअर फाउंडेशन आणि व्हाईस फॉर द व्हाईसलेस अ‍ॅनिमल ग्रुपचा ''डॉग कॅम्पेन''

दीपक कुलकर्णी- पुणे : रस्त्यावरच्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. यात कुणाला जीव गमवावा लागतो तर कुणी गंभीर जखमी होते..पण एक आपल्या जमेची बाजू म्हणजे आपल्यावर उपचार करता येतात. तसे आपण काही नियमांचे पालन केले तर अपघातांच्या संख्येवर नियंत्रण मिळवू शकतो. परंतु, कधी शहरात तर कधी महामार्गावरील अपघातात मुक्या प्राण्यांचा होणाऱ्या मृत्यूची संख्या पण लक्षणीय आहे. यात रात्रीच्या वेळी होणारे अपघात जास्त आहे. यात भटक्या श्वानांमुळेही बरेच अपघात घडतात. त्यामुळे या श्वानांपासून घडणाऱ्या अपघातातून वाचण्यासाठी काही तरुण पुढे आले आहे . त्यांनी केलेला एक अफलातून प्रयोगामुळे कुत्र्यांमुळे होणारे अपघात आणि त्यांचा मृत्यू यातून बचाव होण्यास निश्चित मदत होणार आहे.  शहर आणि महामार्ग रस्त्यांवरती श्वानांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे. परंतु त्यावर संपूर्ण दिवस फक्त चर्चा होते त्यात अपघातातील व्यक्ती विषयी सहानुभूती आणि श्वानांविषयी तिरस्काराची भावना व्यक्त करून दिवस मावळला की घडलेला प्रसंग विसरून जातो..पण रात्रीच्या वेळेस भरधाव वेगातील वाहनाच्या धडकेमुळे जेव्हा एखाद्या कुत्र्याचा जीव जातो किंवा तो जखमी होतो तेव्हा त्याला समाज किती गांभीर्याने घेतो..? पण लव्ह केअर फाउंडेशन आणि व्हाईस फॉर द व्हाईसलेस अ‍ॅनिमल ग्रुप च्या माध्यमातून ''डॉग कॅम्पेन'' च्या नावाखाली एक स्तुत्य उपक्रम शहर परिसर आणि महामार्गावर राबविला जात आहे. त्यातून आत्तापर्यंत अनेक कुत्र्यांचा जीव तर वाचला आणि अपघातांची संख्या कमी होण्यास देखील मदत होत आहे.     'फ्रेंडशिप डे ' च्या दिवशी काही मित्र एकत्र आले त्यांनी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष फक्त पाच दिवस ५० रुपयांचे योगदान मागितले होते. त्या आवाहनाला तुफान प्रतिसाद मिळाला आणि देशभरातून जवळपास ३०, ००० रुपये जमा झाले..यातून ५०० रिफ्लेक्टिव्ह एलईडी कॉलर तयार केल्या आहेत. त्यामुळे अंधारात वाहन चालवणाऱ्या माणसाला समोर काहीतरी असल्याची जाणीव होईल. आणि गाडीचा ब्रेक नियंत्रित करण्यासंबंधी पावले टाकून अपघात टाळतायेईल.खांद्यावरच्या बॅगेसारखी मानेच्या साईजप्रमाणे कमी जास्त अशी अ‍ॅडजस्ट करता येणे ही या ‘रिफ्लेक्टिव्ह कॉलर ‘ची खासियत आहे. ज्यातून त्या कुत्र्याची ओळख तयार होते. एका रिफ्लेक्टिव्ह कॉलरचा साधारण खर्च ४० रुपये आहे. पहिल्या टप्प्यांत २५० कॉलर तयार करण्यात आल्या होत्या, त्या शहरातील वानवडी, हडपसर गाडीतळ, आगाखान पॅलेस, एनआयबीएम रस्ता, तळजाई, सातारा रस्ता, कात्रज परिसरात ही मोहीम हाती घेतलेली आहे. येत्या काही दिवसात पुणे- बेंगलोर महामार्गावर मोहीम राबविण्यात येणार आहे. 

या मोहिमेबाबत पियुष शहा हा तरुण म्हणाला, श्वानांसाठीचे रिफ्लेक्टर कॉलर आम्ही इंदोरहून मागवले आहे.तसेच या कॉलर बारामाही उत्तमप्रकारे कार्यरत राहणाऱ्या आहेत. कुत्र्याच्या गळ्यात त्या बांधल्यामुळे नक्कीच त्यांच्यापासून होणाऱ्या अपघातात घट होण्यास मदत  होईल.श्वानांना रिफ्लेक्टर कॉलर बांधल्यानंतर एक ओळखपत्र तयार केले जाते. ज्यात त्या कुत्र्याचे लसीकरण, आजार अशी आरोग्याशी निगडित माहिती नोंदवलेली असते.

* कोट  माझ्या मामाचा कुत्र्याला वाचवाण्याच्या नादात अपघात होऊन ते दुभाजकाला धडकले होते. त्यात त्यांचा ब्रेन डेड झाला होता. तेव्हापासून कुत्र्यांपासून होणाºया अपघातासाठी काही काम करण्याचा मनोदय होता..परंतु या फ्रेंडशिप डे ला या उपक्रमाची सुरुवात झाली. अवघ्या पाच दिवसांत ५० रुपयांच्या योगदानातून तीस हजार रुपये जमा झाले.. कुणी मदत घेताना एक ऑनलाईन फॉर्म भरून घेतला. त्यात या उपक्रमाची दिवसागणिक सविस्तर माहिती त्या सहकार्य करणाऱ्या व्यक्तीला देत आहोत. जमा झालेल्या रकमेतून ५०० रिफ्लेक्टर कॉलर तयार केल्या असून शहरात आणि महामार्गावर ही मोहीम अधिक व्यापकपणे राबविली जाणार आहे...- पियुष शहा, लव्ह केअर फाउंडेशन 

टॅग्स :Puneपुणेdogकुत्राAccidentअपघात