शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कमी उत्पन्नामुळे पीएमपीच्या मिडी बसला ‘रेड सिग्नल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 19:01 IST

पीएमपीकडे २०० हून अधिक मिडी बस आहेत..

ठळक मुद्दे‘पीएमपी’ ताफ्यात बारा मीटर लांबीच्या सुमारे ३७५ नवीन सीएनजी बस दाखलदोन्ही आगारांमधून प्रामुख्याने नवीन बस मार्गावर आणण्यालाच प्राधान्य

पुणे : पिंपरी व भोसरी येथील आगारात जागा नसल्याने शेवाळवाडी येथील आगारात २५ ते ३० मिडी बस काही दिवसांपासून पार्किंग करण्यात आल्याचा दावा पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून  केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या बसला इतर बसच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळत असल्याने रेड सिग्नल दिला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. भोसरी व पिंपरी आगाराला १२ मीटर लांबीच्या नवीन बस देण्यात आल्याने तसेच तिथे मिडी बस उभ्या करण्यासाठी जागा नसल्याने शेवाळवाडी येथे बस आणण्यात आल्या होत्या. ‘पीएमपी’ ताफ्यात बारा मीटर लांबीच्या सुमारे ३७५ नवीन सीएनजी बस दाखल झाल्या आहेत. या बसपैकी पिंपरी व भोसरी आगारालाही काही बस देण्यात आल्या आहेत. या आगारांमध्ये पुर्वीपासून मिडी बसही आहेत. नवीन बसमधील प्रवाशांची संख्या व त्यातून मिळणारे उत्पन्न मिडी बसपेक्षा जवळपास दुपटीने अधिक आहे. त्यामुळे दोन्ही आगारांमधून प्रामुख्याने नवीन बस मार्गावर आणण्यालाच प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, मिडी बस मार्गावर आणल्या जात नाही. या बस दोन्ही आगारांमध्ये उभ्या करण्यासाठी जागेचीही कमतरता आहे. त्यामुळे शेवाळवाडी येथे २५ ते ३० आणून उभ्या करण्यात आल्या होत्या. आमदार चेतन तुपे यांनी ही बाब पुढे आणल्यानंतर यावर प्रकाश पडला आहे. दरम्यान, गुरूवारी या सर्व बस तिथून हलवून भोसरी आगाराकडे पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.पीएमपीकडे २०० हून अधिक मिडी बस आहेत. मागील दोन वर्षांपासून या बस मार्गावर धावत आहेत. ‘पीएमपी’ प्रशासनाकडून केवळ जागेचे कारण सांगितले जात असले तरी मिडी बसमुळे मिळणारे कमी उत्पन्न आणि त्यातील काही तांत्रिक दोषांमुळे या बस मार्गावर आणण्यात आल्या नाहीत, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मागील काही दिवसांत मिडी बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाणही वाढले आहे. तसेच अन्य काही तांत्रिक दोषही निर्माण होत आहेत. या बसबाबत काही वरिष्ठांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. एक ते दीड वर्षाच्या आतच अनेक बसमध्ये तांत्रिक दोष निर्माण होऊ लागल्याने बसच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही या अधिकाºयाने सांगितले. -------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड