शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

विनापासिंग वाहन चालकांकडून पाच वर्षांत ३६ लाखांचा दंड वसुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 7:55 PM

केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत विनापासिंग वाहन चालविण्यास अथवा ते खरेदीदाराच्या ताब्यात देण्यास कायद्याने मनाई केली आहे.

ठळक मुद्देआरटीओ कारवाई : प्रत्येक वाहनचालकांना सरासरी एक हजाराचा भुर्दंड

पुणे : विनापासिंग वाहन दामटणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडले आहे. गेल्या पाच वर्षांत ४ हजार वाहनचालकांकडून तब्बल ३६ लाख २० हजार ६०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. प्रत्येक वाहनचालकाला सरासरी एक हजार रुपयांचा भुर्दंड त्यामुळे सोसावा लागला आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत विनापासिंग वाहन चालविण्यास अथवा ते खरेदीदाराच्या ताब्यात देण्यास कायद्याने मनाई केली आहे. संबंधित वाहन वितरकासह असे वाहन चालविणाऱ्या व्यक्तीवर देखील प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कारवाई करण्यात येते. आरटीओच्या वतीने अशा वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येते. आरटीओने २०१३ ते फेब्रुवारी २०१८ अखेरीस तब्बल ४ हजार १९ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३६ लाख २० हजार ६०० रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे. चालू वर्षांत जानेवारी महिन्यात ११२ वाहनचालकांकडून १ लाख ४० हजार, तर फेब्रुवारी महिन्यात ५९ वाहनचालकांकडून ६५ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते वाजिद खान यांनी ही माहिती समोर आणली आहे. अशा वाहनांवर कारवाई होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. शहरात २०१३ साली ३४२ वाहनचालकांना ३ लाख ५० हजार ८०० आणि २०१४ मध्ये ४६२ वाहनचालकांकडून ३ लाख ३५ हजार ७०० रुपयांचा दंड ठोठावला होता. कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकांची संख्या २०१७ मध्ये १ हजार ३३० इतकी झाली. त्यांच्याकडून १५ लाख ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.  ग्राहकांना मुहूर्तावर वाहने हवी असतात. या काळात मागणी असल्याने ग्राहक देखील अनेकदा पासिंग न करताच वाहन नेणे पसंत करतात. ग्राहकांच्या मागणीपुढे वितरक देखील कोणतीही आडकाठी आणत नाहीत, असे वाहन क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले.  -----------------------------

विना पासिंग वाहनांवरील कारवाई

साल            वाहनसंख्या        दंडाची रक्कम रुपयात२०१५            २६३            ५,०२,५००२०१६            ९५१            ६,८४,६००२०१७            १,३३०            १५,४२,०००२०१८            १७१            २,०५,०००

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर