शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतीची साडे दहा कोटींची रक्कम संचालक मंडळाकडुन वसुल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST

\Sशेतकरी कृती समितीची मागणी : तोडणीसाठी वाहतूक यंत्रणा न दिल्याने घोळ बारामती : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना ...

\Sशेतकरी कृती समितीची मागणी : तोडणीसाठी वाहतूक यंत्रणा न दिल्याने घोळ

बारामती :

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२०२१ साठी तोडणी वाहतुकीपाटी ३१ कोटी इतक्या रकमेचे वाटप केले आहे. त्यापैकी तोडणी वाहतुकीपोटी अ‍ॅडव्हान्स घेतलेल्या १८१ व्यक्तींनी अंदाजे तोडणी वाहतुक यंत्रणा न दिल्यामुळे १० कोटी ५७ लाख इतकी रक्कम गुंतून पडली आहे. त्यामुळे कारखान्याला अर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. या वाटपाची चौकशी करून ही रक्कम संचालक मंडळाकडुन वसुल करण्याची मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत बाळासाहेब कोळेकर, रामचंद्र निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, बाळासाहेब रायते, विशाल निंबाळकर यांनी साखर आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार संबंधित रक्कम वसुली बाबत कारखान्याने कुठलेही ठोस उपाय केलेले नाहीत. त्यासाठी संपुर्ण संचालक मंडळ जवाबदार आहे. हे अ‍ॅडव्हान्स वाटप हेतु पुरस्सर तसेच चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे.

कारखान्याचा सन २०२०-२०२१ चा गळीत हंगाम सुरू होऊन एक महीना लोटला. मात्र,अद्याप एफआरपीची पूर्ण रक्कम कारखान्याने दिलेली नाही. त्यामुळे ही रक्कम १५ टक्के व्याजासह देण्यात यावी. तशी कायद्यात तरतुद आहे, याची नोंद घ्यावी. कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२०२१ चे उत्पादित होणारी मळी प्रति टन ५५००हजार रुपये प्रमाणे ३० हजार मे. टन इतकी आगाऊ विक्री केली आहे . पुढील विक्री करावयाचे चालले आहे. कारखान्याच्या मालाची होणारी कुठलीही विक्री सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहीरात देऊनच करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

चौकट

कारखाना आर्थीक अडचणीत असल्यामुळे यावर अवलंबुन असणाऱ्या तीस हजार ऊस उत्पादक सभासदांच्या प्रपंचाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कारखान्याचे विशेष लेखापरिक्षण करून घ्यावे व ही परिस्थिती निर्माण करणाºयावर जवाबदारी निश्चित करावी. कारखान्याच्या सहवीज निमीर्ती प्रकल्पाच्या वीज वहनासाठी उभ्या करण्यात आलेल्या वीजवाहक तारा व खांब ज्या शेतकºयांच्या शेतातून गेले आहेत, त्यांना बेकायदेरीर करार करून कामावर घेतलेले आहे. या सर्व प्रकरणाची त्वरीत चौकशी करण्यात यावी,अशी मागणी समितीने केली आहे.