शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला आरोग्य विद्यापीठाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:00 AM

पुणे : महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (atal bihari medical college pune) गुरुवारी महाराष्ट्र आरोग्य ...

पुणे : महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीयमहाविद्यालयाला (atal bihari medical college pune) गुरुवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकने मान्यता दिली आहे. यामुळे महापालिकेला वैद्यकीयमहाविद्यालय सुरू करण्यासाठीची शेवटची व आवश्यक असलेली अंतिम मान्यताही मिळाली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयास सर्व परवानग्या मिळाल्याने, येत्या शैक्षणिक वर्षासाठी येत्या काही दिवसांत विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली, तर विद्यापीठाच्या पथकाने आपल्या पाहणीत ज्या काही त्रुटी काढल्या आहेत, त्याची पूर्तता येत्या काही दिवसांत तातडीने केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले़

महापालिकेला वैद्यकीय महाविद्यालयाची केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यावर, ७ मार्च रोजी लेटर ऑफ इनटेंट देऊन १०० जागांवर प्रवेश करण्यास केंद्र शासनाकडून मान्यता देण्यात आली. त्याआधारे राज्य शासनाकडे महापालिकेने प्रस्ताव पाठवला असता शासनाने याबाबतचा आदेश काढून २०२१-२२ च्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे. यामुळे सीईटी सेलमार्फत एमबीबीएसच्या फेरीमध्ये या १०० जागा उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या पथकाने नुकतीच पुण्यात येऊन महाविद्यालयातील वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वसतिगृह यासह इतर सुविधांची पाहणी केली होती. गुरुवारी त्याबाबतची अंतिम मान्यता मिळाल्याने महापालिकेकडून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाकरिता सर्व मान्यता मिळाल्या असून, येत्या आठ दिवसांत १०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. केंद्रीय पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया होणार असून, महाविद्यालयांच्या यादीमध्ये महापालिकेच्या महाविद्यालयाचे नाव समाविष्ट केले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हा पर्याय खुला होणार असून, सध्या वैद्यकीय विभागाच्या प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयMuncipal Corporationनगर पालिकाNashikनाशिकAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी