रवींद्र जगदाळे राज्यस्तरीय आदर्श वस्ताद पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:01+5:302021-02-05T05:05:01+5:30

मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात छावा प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार रवींद्र जगदाळे यांना देण्यात आला. रवींद्र जगदाळे ...

Ravindra Jagdale honored with state level Adarsh Vastad Award | रवींद्र जगदाळे राज्यस्तरीय आदर्श वस्ताद पुरस्काराने सन्मानित

रवींद्र जगदाळे राज्यस्तरीय आदर्श वस्ताद पुरस्काराने सन्मानित

मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात छावा प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार रवींद्र जगदाळे यांना देण्यात आला. रवींद्र जगदाळे हे महाराष्ट्र राज्य भारतीय मर्दानी खेळ महासंघ व मर्दानी खेळ राज्य असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. शिवकालीन युद्धकला या विषयावर अनेक किल्ल्यांवर मर्दानी खेळाचे सादरीकरण व व्याखाने त्यांनी दिली आहेत. त्यांनी इंडियन नेव्ही, भारतीय स्थलसेना मधील जवानांना प्रोत्साहन देण्यसाठी युद्धकलांचे प्रात्यक्षिके सादर केली आहेत.

त्यांना वीर हुतात्मा भाई कोतवाल राज्यस्तरीय पुरस्कार, राज्यभिषेक सोहळा समितीच्या वतीने रायगडावर त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दतात्रय अनारसे, जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष नीलेश पांडे, ह.भ.प रविकांत रसाळ, महामंडळाचे नेते मारुतीआप्पा पंडित, राजाभाऊ रायकर, नितीन राऊत, भारत मोरे, मुन्ना शिंदे, चंद्रशेखर जगताप, अंकुश खडके , महेश सांगळे ,शिवाजी राऊत आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक रवींद्र जगदाळे यांना राज्यस्तरीय आदर्श वस्ताद पुरस्काराने सन्मानित करताना मान्यवर.

Web Title: Ravindra Jagdale honored with state level Adarsh Vastad Award