शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

रासप पंकजा मुंडे यांच्या पाठीशी

By admin | Updated: June 29, 2015 23:36 IST

महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बिनबुडाचे आरोप करीत आहेत. तेव्हा राष्ट्रीय समाज पक्ष पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील.

दौंड : महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बिनबुडाचे आरोप करीत आहेत. तेव्हा राष्ट्रीय समाज पक्ष पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील. दरम्यान, बिनबुडाचा आरोप करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा रासपच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. या निषेधाचे पत्र तहसीलदार उत्तम दिघे यांना देण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिष खोमणे यांनी दिली. गेल्या लोकसभा आणि विधानसभेत मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे सत्तेची चटक लागलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजपा आणि मित्र पक्षाचा चांगला कारभार पहावेनासा झाल्याने ही मंडळी पंकजा मुंडे यांच्यावर बिनबुडाचा आरोप करीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर भाजपचे ज्येष्ट नेते वासुदेव काळे, रासपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, हरिष खोमणे, संदिपान वाघमोडे, विशाल माशाळकर, नागेश बेलुरकर, मोहन पडवळकर, अझरुद्दीन मुलाणी, किरण वाघमोडे, गणेश चोरमले, ज्ञानदेव मेरगळ, रमेश खताळ, ज्ञानदेव ताकवणे, स्वप्निल होले, अविनाश चौगुले यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)