शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ ठेवा परत मिळाल्याने प्रभा अत्रेंनी व्यक्त केले समाधान

By admin | Updated: June 13, 2017 22:13 IST

गेल्या अनेक वर्षांमध्ये संगीत क्षेत्रात जी साधना केली. त्याची साक्ष देणा-्या दुर्मीळ मैफिली, संगीताचे कार्यक्रम, सादर केलेली गाणी

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 13  -  गेल्या अनेक वर्षांमध्ये संगीत क्षेत्रात जी साधना केली. त्याची साक्ष देणा-्या दुर्मीळ मैफिली, संगीताचे कार्यक्रम, सादर केलेली गाणी पोलिसांच्या तत्परतेमुळे परत मिळाली. एक प्रकारे अनेक वर्षांची संगीत साधनाच परत मिळाली असल्याची भावना व्यक्त करीत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी पुणे पोलिसांचे आभार मानले. अनेक वर्षांपासून केलेली संगीत साधना, दुर्मिळ आणि गाजलेल्या मैफलीतील गायन, रसिकांना भुरळ घातलेल्या बंदिशी या संगीत साधकाला पैशांपेक्षा मोलाच्या असतात. या आठवणी त्याच्यापासून दूर जातात, तेव्हा विलक्षण दु:ख होते. पण, त्या पुन्हा मिळतात तेव्हा आनंद गगनात मावत नाही,असे सांगताना त्या भावनाविवश झाल्या होत्या.
  दोन दिवसांपूर्वी पहाटे चोरांनी अत्रे यांच्या घरातून त्यांचे तीन मोबाइल आणि हार्ड डिस्क चोरल्या होत्या. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्परतेने कारवाई करून चोराला दोन दिवसांत जेरबंद केले. त्याच्याकडून अत्रे यांचे मोबाइल आणि हार्ड डिस्क जप्त करून त्यांनी मंगळवारी अत्रे यांच्या घरी जाऊन सर्व मुद्देमाल परत केला. पैशांपेक्षा अनमोल असलेला ठेवा पोलिसांनी परत केल्याने अत्रे यांनी पोलिसांच्या पथकाचे आभार मानले. अत्रे म्हणाल्या, मी ज्या जुन्या मैफिलींमध्ये गायले त्यातील अनेक दुर्मिळ अशा बंदिशी हार्ड डिस्कमध्ये होत्या. सध्या एका पुस्तकावर काम करीत आहे. त्यातील मजकूर; शिवाय नव्याने सुरू करीत असलेल्या काही
प्रोजेक्ट्सची माहितीही त्यात होती. माझ्यासाठी तो अत्यंत अनमोल असा ठेवा आहे. अनेक आठवणी त्यात साठवलेल्या आहेत. हार्ड डिस्क चोरीला गेल्याने अस्वस्थ व्हायला झाले होते. परंतु, त्या सगळ्या आठवणी पुन्हा परत मिळाल्याने अत्यंत आनंद होत आहे. पोलिसांनी अशा प्रकारे पुणेकरांच्या तक्रारींबाबतीत तत्परता दाखवून त्यांच्या प्रकरणांचा छडा लवकरात लवकर लावावा, अशी अपेक्षाही अत्रे यांनी या वेळी व्यक्त केली.