पानशेतमधील चिमुरडीवरील बलात्काऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, एक वर्षाने मिळाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 14:07 IST2022-03-01T14:01:44+5:302022-03-01T14:07:35+5:30

या प्रकरणाने पुणे जिल्हा हादरला होता...

rapist on minor girl in panshet sentenced hanging to death latest crime news | पानशेतमधील चिमुरडीवरील बलात्काऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, एक वर्षाने मिळाला न्याय

पानशेतमधील चिमुरडीवरील बलात्काऱ्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, एक वर्षाने मिळाला न्याय

पुणे : मागील वर्षी पानशेतमधून एका चिमुरडीचे अपहरण होऊन तिच्यावर बलात्कार (panshet rape case) झाला होता. या धक्कादायक घटनेनंतर पुणे जिल्हा हादरला होता. नंतर ती चिमुरडी मालखेडमध्ये मृतावस्थेत आढळली होती. या प्रकरणात आरोपीला न्यायालयाने  मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने पोलिसांच्या विनंतीनंतर हा खटला जलदगती न्यायालयात भरला होता. तिथे आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पानशेतमधून एका चिमुरडीचे अपहरण करून बलात्कार झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. अपहरणानंतर ती चिमुरडी मालखेडजवळ (ता. हवेली, पुणे) एका पुलात मोरीच्या सिमेंटच्या नळीत मृतावस्थेत आढळून आली होती.

या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपी संजय बबन काटकर (वय ३८, रा. कादवे, पानशेत, ता. वेल्हे, पुणे) याला ४८ तासांच्या आत जेरबंद केले होते. आरोपी काटकर यास (२८ फेब्रुवारी, २०२२) जिल्हा न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: rapist on minor girl in panshet sentenced hanging to death latest crime news