Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 13:45 IST2021-11-13T13:41:26+5:302021-11-13T13:45:11+5:30

फिर्यादी पीडित तरुणी व आरोपी हे एकाच ठिकाणी नोकरीस असल्याने त्यांची मैत्री होती. जेवण बनवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादीला त्याच्या घरी बोलावून घेतले. लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले

rape on young woman showing lure of marriage | Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

Pune Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

पिंपरी : एकाच कंपनीत नोकरीला असलेल्या तरुणाची व तरुणीची मैत्री झाली. लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तरुणीवर बलात्कार केला. थेरगाव आणि रावेत येथे १३ मार्च २०२० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ही घटना घडली. पीडित २६ वर्षीय तरूणीने याप्रकरणी शनिवारी (दि. १३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गणेश सुधाकर पारटकर (वय २६, रा. थेरगाव) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी व आरोपी हे एकाच ठिकाणी नोकरीस असल्याने त्यांची मैत्री होती. जेवण बनवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादीला त्याच्या घरी बोलावून घेतले. लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले. त्यानंतर वारंवार त्याच्या राहत्या घरी व रावेत येथे लॉजवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले.

फिर्यादीने आरोपीला लग्नाबद्दल विचारणा केली. दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले असल्याबाबत आरोपीने फिर्यादीला सांगितले. त्यावेळी फिर्यादीस प्रचंड धक्का बसला. फिर्यादीची इच्छा नसताना आरोपी हा फिर्यादी सोबत जबरदस्ती करू लागला. फिर्यादीने त्यास विरोध केला असता आरोपीने फिर्यादीला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जबरदस्तीने शरीर संबंध केले.

Web Title: rape on young woman showing lure of marriage