Pune Crime: लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; हडपसर परिसरातील घटना
By नितीश गोवंडे | Updated: October 14, 2023 16:17 IST2023-10-14T16:17:27+5:302023-10-14T16:17:44+5:30
याप्रकरणी सातववाडी, हडपसर येथील २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे....

Pune Crime: लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; हडपसर परिसरातील घटना
पुणे : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मुकेश रामनिहोर यादव (३४, रा.खांदवे नगर, लोहगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सातववाडी, हडपसर येथील २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना १७ जुलै २०२२ ते २२ जुलै २०२३ या कालावधीत सोमाटणे फाटा, ढोले पाटील रोड वाघोली येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून, नातेवाईकांशी ओळख करुन देतो असे सांगून विविध ठिकाणी घेऊन जावून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारले असता, तु लग्नाचा विषय काढला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मुकेश यादव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक भदे करत आहेत.