पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 14:15 IST2021-10-26T14:12:56+5:302021-10-26T14:15:01+5:30
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
धनकवडी : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली असून शुभम महेश काटे, (वय २१ वर्षे, रा. पद्मावती) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १४ वर्षीय मुलीशी काटे यांनी मागील दोन तीन वर्षांपासून प्रेम संबंध निर्माण केले. आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या वर पद्मावती परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. हि बाब तिच्या आईला समजल्यावर तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे करत आहेत.