शिवसेनेच्या फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, 'शिंदेसेना' हीच खरी शिवसेना: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 10:14 AM2022-09-12T10:14:29+5:302022-09-12T10:15:03+5:30

आठवले पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली नसती तर शिवसेना पक्ष फुटला नसता...

Ramdas Athavale said Uddhav Thackeray is responsible for the split of Shiv Sena eknath shinde | शिवसेनेच्या फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, 'शिंदेसेना' हीच खरी शिवसेना: रामदास आठवले

शिवसेनेच्या फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार, 'शिंदेसेना' हीच खरी शिवसेना: रामदास आठवले

Next

लोणावळा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चुकीमुळेच शिवसेना फुटली असा घणाघाती आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिंदे सेना हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. आठवले म्हणाले, शिवसेना मोडकळीस आली आहे, तिची अवस्था दयनीय झाली आहे, काँग्रेस पक्ष दुबळा झाला आहे तर राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत ताकद कमी असल्याने मुंबई महानगरपालिकेवर यावेळी भाजप, आरपीआय व शिंदे गट सत्ता स्थापन करणार यात शंका नाही.

मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता हिसकावून घेण्याचा आमचा प्रयत्न असून उपमहापौर आरपीआयला मिळावे, असा ठराव रविवारी लोणावळ्यात पार पडलेल्या आरपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आठवले पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी केली नसती तर शिवसेना पक्ष फुटला नसता. शिवसेना व शिंदे गटातील वादावर बोलताना आठवले म्हणाले, शिंदे गटाकडे दोन तृतियांश बहुमत आहे. सर्वाधिक आमदार व खासदार त्यांच्यासोबत असल्याने धनुष्यबाण हे चिन्ह देखील त्यांनाच मिळावे, १६ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा देखील चुकीचा आहे. खंडपीठ याबाबत योग्य निर्णय देईल याची खात्री आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासोबतच दसरा मेळाव्यासाठी ताकदवार शिवसेना कोणाची हे पाहून परवानगी द्यावी, असा सल्ला मुंबई महापालिकेला दिला.

आठवले म्हणाले, राज्यात फडणवीस व शिंदे सरकार चांगले काम करत आहे. ओला दुष्काळ त्यांनी जाहिर केला असून केंद्राच्या धर्तीवर मुख्यमंत्री किसान योजना जाहिर करत शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पश्चिम महाराष्ट्र नुतन अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, अशोक गायकवाड, जितेंद्र बनसोडे, गणेश गायकवाड, यमुनाताई साळवे, लक्ष्मण भालेराव, कमलशिल म्हस्के, दिलीप दामोदरे उपस्थित होते.

Web Title: Ramdas Athavale said Uddhav Thackeray is responsible for the split of Shiv Sena eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.