शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर अखेर नगर परिषद

By admin | Updated: August 15, 2014 01:07 IST

स्वातंत्र्यदिनी राजगुरुनगरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून शासनदरबारी प्रलंबित असलेल्या नगर परिषद प्रस्तावावर सरकारने शिक्कामार्तेब केले आहे.

राजगुरुनगर : स्वातंत्र्यदिनी राजगुरुनगरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून शासनदरबारी प्रलंबित असलेल्या नगर परिषद प्रस्तावावर सरकारने शिक्कामार्तेब केले आहे. नगरविकास विभागाचे उपसचिव ज. ना. पाटील यांनी अखेर ‘क’ दर्जाची नगर परिषदेचे आदेश आज काढले.स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही बातमी समजल्याने राजगुरुनगरवासीयांनी आनंद व्यक्त केला. ‘लोकमत’ने या नगर परिषदेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्याची बातमी सर्वप्रथम २४ जुलैच्या अंकात दिली होती. शासन उद्घोषणा नगरविकास विभाग एनयुपी-२०१२/प्र. क्र. ६५ पुनर्बांधणी २१ नवीन १९(२) नुसार राजगुरुनगर नगर परिषद गठीत झाल्याचा आदेश नगरविकास उपसचिव ज. ना. पाटील यांनी दिला. त्यानुसार राजगुरुनगरचे सर्व्हे क्र. १ ते ३२९ हे क्षेत्र या नगर परिषदमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये काही सर्व्हे नंबर तिन्हेवाडी, सातकरस्थळ, राक्षेवाडी या ग्रामपंचायातीमधील आहेत. गेली अनेक दिवस शासनदरबारी राजगुरुनगर येथे नगरपालिका व्हावी, यासाठीचा प्रस्ताव प्रलंबित होता. त्यासाठी राजकीय स्तरावर खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील आग्रही होते. नीलेश कड पाटील ही या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करीत होते. मध्यंतरीच्या काळात शासनाने राज्यातील ग्रामपंचायती असलेल्या सर्व तालुक्यांच्या गावी नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. राजगुरुनगर नगर परिषद होण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया आधीच पूर्ण झालेल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषद करणे योग्य असल्याचा अभिप्राय दिला होता. त्यामुळे राजगुरुनगरचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. सर्व निकष राजगुरुनगरने पूर्ण केलेले होते. नवीन शासन निर्णयामुळे त्याला अजून बळ मिळाले. त्यामुळे शासनाने राजगुरुनगर येथे नगर परिषद स्थापनेस मान्यता दिली व आज आदेश काढला. या निर्णयामुळे शासनाने राज्यातील ज्या १३८ तालुक्यांच्या गावी नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला होता, त्यात राजगुरुनगरचा प्रथम क्रमांक लागला.(वार्ताहर)