राजाराम पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु होणार; 'या' वेळेत पुल राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 17:00 IST2025-12-27T17:00:09+5:302025-12-27T17:00:18+5:30
राजाराम पुलाची २६ डिसेंबरपासून ते १७ जानेवारीपर्यंत दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

राजाराम पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु होणार; 'या' वेळेत पुल राहणार बंद
पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाची आजपासून दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या पुलाची एक लेन वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. हे काम १७ जानेवारीपर्यंत सुरू असणार आहे, अशी माहिती महापालिका प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली.
राजाराम पुलाची २६ डिसेंबरपासून ते १७ जानेवारीपर्यंत दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पुलावरील एक लेन वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दरम्यान हे काम रात्री ११ वाजल्यापासून ते पहाटे ५ पर्यंत काम चालणार आहे. एक लेन बंद असली तरी दुसरी लेन ही सुरू राहणार आहे. हे काम फक्त रात्री होणार आहे. दिवसा या दोन्ही लेन सुरू असणार आहेत. त्यामुळे दिवसा वाहतुकीची समस्या नसणार आहे, असे महापालिका प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी सांगितले.
कर्वेनगर आणि सिंहगड रस्त्याला जोडणारा राजाराम पूल आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे ट्राफिक थोडेफार कमी झाले आहे. त्यामुळे जर दिवसा राजाराम पूल बंद केला. तर सिंहगड रोडवर पुन्हा ट्राफिक वाढण्याची शक्यता आहे. म्हणून दिवसभर पूल सुरु ठेवून रात्री बंद करण्यात येणार आहे. तसेच पुलाची एक लेन सुरु राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.