राज ठाकरेंची 'शोले'स्टाईल; शालेय जीवनात पाहिलेली 'ती' अत्यंत भ्रष्ट ग्रामपंचायत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 05:50 PM2024-01-13T17:50:17+5:302024-01-13T18:21:31+5:30

मध्यंतरी मी एका गावात गेलो होतो. तिथे अत्यंत वाईट अवस्था होती.

Raj Thackeray 'Sholay' style; 'This' very corrupt Gram Panchayat seen in school life of ramgarh | राज ठाकरेंची 'शोले'स्टाईल; शालेय जीवनात पाहिलेली 'ती' अत्यंत भ्रष्ट ग्रामपंचायत

राज ठाकरेंची 'शोले'स्टाईल; शालेय जीवनात पाहिलेली 'ती' अत्यंत भ्रष्ट ग्रामपंचायत

पुणे - मी १९८९ साली सक्रीय राजकारणात आलो. राज्यात फिरलो, अनेक गावागावात फिरलो. सगळ्या ठिकाणी मला दुरावस्था दिसली ती स्वच्छतेची, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गावागावातील स्वच्छता आणि ग्रामंचायतीच्या कारभारावर भाष्य केलं. पुण्यात मनसेचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे बोलत होते. त्यावेळी, एका ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराचा उल्लेख करताना, राज ठाकरेंनी शोले पिच्चरची आठवण सांगितली.   

मध्यंतरी मी एका गावात गेलो होतो. तिथे अत्यंत वाईट अवस्था होती. गावात एक टाकी होती. माझ्या शालेय जीवनात मी अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत पाहिली ती म्हणजे रामगडची, माहितीय ना रामगड असे म्हणत उपस्थितांना प्रश्नही केला. त्यानंतर, शोले सिनेमातील रामगड असे राज यांनी म्हटले. त्या गावातील प्रमुख, सर्वात श्रीमंत ठाकूर त्याच्या घरात लाईट नाही. त्या गावात गेल्यावर रामगडची टाकी आठवली. कारण ठाकूरच्या घरात लाईट नाही, मग त्या टाकीत पाणी कुठून नेणार आहे?, असा मिश्कील टोला राज यांनी लगावला. तसेच, हे चित्र तुम्हाला बदलायचे आहे, असे आवाहनही उपस्थितांना केले.  

तुमचे गाव तुम्ही चांगले ठेवा. गावचे वातावरण बदला. गावातील माताभगिनी महिला त्यांना राहावसे वाटले पाहिजे. तुम्हाला गावात बोलवावं वाटलं पाहिजे असं वातावरण करा. ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही त्यांचीही कामे करा. कुणावरही सूड उगवू नका. जर तुम्ही वातावरण चांगले केले तर त्या गावातून तुम्हाला कुणीही घालवू शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा बदलू शकत नाही असं राज ठाकरेंनी सांगितले. 

राज ठाकरे देणार ५ लाखांचे बक्षीस

गावातील नागरिकांची बैठक बोलवा. गाव स्वच्छ कसं ठेवायचे याबाबत चर्चा करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात जी ग्रामपंचायत असेल त्यातील जी सर्वात स्वच्छ ग्रामपंचायत असेल तिथे मी स्वत: येऊन ग्रामपंचायतीसाठी ५ लाखांचा निधी देईन. इतरांसारखी फक्त घोषणा करत नाही. जे तुमच्या आवाक्यात असेल त्या सर्व गोष्टी करा. लोकांचे मतरुपी आशीर्वाद मिळालेत त्यामुळे चांगले काम कायम तुमच्या हातून घडलं पाहिजे. लोकांना समाधानी ठेवा. तुम्ही इतक्या लांबून इथं आलात मला दर्शन दिले त्याबद्दल तुमचे आभारी आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं. 

२२ तारखेला कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय...  

२२ तारखेला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका. तिथे राम मंदिर होण्यापेक्षा ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले त्यांनी स्वप्न पाहिले ते स्वप्न २२ जानेवारीला पूर्ण होतंय म्हणून जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे लोकांना त्रास न होता महाआरती करा, पूजा करावी असं आवाहनही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले. 
 

Web Title: Raj Thackeray 'Sholay' style; 'This' very corrupt Gram Panchayat seen in school life of ramgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.