आयटी पार्कमध्ये पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी वाहिनी;हिंजवडीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजनांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:22 IST2025-06-19T15:21:04+5:302025-06-19T15:22:26+5:30

- यासंदर्भात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेत संबंधित कामे करण्याचे निर्देश दिले होते.

Rainwater drainage channel in IT Park Focus on solutions to solve urban problems in Hinjewadi | आयटी पार्कमध्ये पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी वाहिनी;हिंजवडीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजनांवर भर

आयटी पार्कमध्ये पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी वाहिनी;हिंजवडीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजनांवर भर

पिंपरी :हिंजवडी फेज १, २ आणि ३ येथील मेट्रो मार्गिकेलगत आणि अन्य भागातील रस्त्यांवरील पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ता दुरुस्ती तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांच्या समस्यांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह (पीएमआरडीए) इतर यंत्रणेच्या माध्यमातून अपेक्षित कामे करण्यात येत आहेत. यासंदर्भात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेत संबंधित कामे करण्याचे निर्देश दिले होते.

हिंजवडीतील समस्यांबाबत दखल घेण्यात आली असून महानगर आयुक्तांच्या निर्देशानुसार कामे सुरू आहेत. पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांच्यासह पीएमआरडीएच्या इतर यंत्रणांच्या नियंत्रणात हिंजवडीतील पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ता दुरुस्तीसह इतर मूलभूत नागरी समस्यांबाबत कामे करण्यात येत आहेत.

यंत्रणेमार्फत सुरू असलेली कामे

- मेट्रो सवलतकार कंपनीमार्फत मेट्रो स्थानक व मेट्रो वायाडक्टदरम्यान राडारोडा उचलण्याचे काम प्रगतिपथावर.
- एमआयडीसी विभागामार्फत डोहलर कंपनीसमोर आणि साई प्रोविजो इमारतीच्या ठिकाणी, मेट्रो स्थानक क्र. २ येथील वनविभागाच्या जागेलगत पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी टाकण्यात येत आहे.
- एमआयडीसी विभागामार्फत मेट्रो मार्गिकेलगतच्या नाल्याच्या ठिकाणी नाले साफसफाईचे काम करण्यात येत आहेत.
- प्राधिकरणाच्या विकास परवानगी विभागामार्फत विलास जावडेकर यांच्या प्रकल्पास नोटीस काढण्यात आली असून प्राधिकरणाच्या अनधिकृत विभागामार्फत स्थानक क्र. ३ या ठिकाणी जावडेकर इमारतीच्या येथे अनधिकृत रॅम्प बांधकाम तोडण्यात येत आहे. हिंजवडी फेज - २ येथील पांडवनगर क्षेत्राच्या ठिकाणी राडारोड्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
- एमआयडीसी, प्राधिकरण आणि टाटा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या समवेत पथदिवे हस्तांतरणासंबंधी संयुक्त पाहणी करण्यात आली असून टाटा कंपनीस काही दुरुस्ती सूचनेच्या अनुषंगाने काम प्रगतिपथावर आहे.
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाच्या मुख्य रस्त्यावरील मेट्रो स्थानक क्रमांक एक येथील अनधिकृत स्टॉल काढण्यात आले आहेत.
- मेट्रो सवलतकार कंपनीमार्फत आणि एमआयडीसीमार्फत खड्डे बुजविण्याचे काम प्रगतिपथावर.
- टाटा कंपनीमार्फत स्टेशनच्या ठिकाणी दिशादर्शक व योग्य ते माहितीफलक लावण्यात आले आहेत. 

Web Title: Rainwater drainage channel in IT Park Focus on solutions to solve urban problems in Hinjewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.