पुण्यात पावसाच्या सरी ; उपनगरात जोरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 21:52 IST2018-03-18T21:52:11+5:302018-03-18T21:52:11+5:30

पुणे शहर अाणि उपनगरात पावसाने अाज हजेरी लावली. अचानक अालेल्या पावसामुळे अनेकांची मात्र तारांबळ उडाली

Rain in Pune and Suburbs | पुण्यात पावसाच्या सरी ; उपनगरात जोरदार

पुण्यात पावसाच्या सरी ; उपनगरात जोरदार

ठळक मुद्देउपनगरात पावसाच्या जाेरदार सरीअचानाक अालेल्या पावसामुळे अनेकांची उडाली तारांबळ

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना अखेर रविवारी पावसाने शहर व उपनगरात हजेरी लावली. संध्याकाळी येरवडा, विश्रांतवाडी, नऱ्हे, धायरी या उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पेठांमध्येही हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैरान झालेल्या पुणेकरांना जरासा दिलासा मिळाला आहे. शहरातील 4 ठिकाणी झाडपडीच्या घटनांची सुद्धा नाेंद झाली अाहे. तर शहरातील 14 ठिकाणी रस्ता निसरडा झाल्याची अाणि अाईल सांडल्याच्या घटना घडल्या अाहेत. 
    काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. हवामान खात्यानेही पाऊसाचा अंदाज वर्तवला होता. रविवारी सकाळ पासूनच संपूर्ण शहरात ढग दाटून आले होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास शहराच्या उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली. साधारण तासभर झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणीही साठले होते. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. 
    पावसाच्या सरींमुळे वातावरणातील गारवा वाढला होता. उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. पेठांमध्ये हलका शिडकाव झाल्याने मातीचा सुगंध सर्वत्र दरवळला होता. आंबेगाव पठार, दत्तनगर, आंबेगाव खु. नऱ्हेगाव, वारजे या ठिकाणीही पावसाने चांगलीच हजेरी लावली. उद्याही शहर अाणि परिसरात हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली अाहे. 

Web Title: Rain in Pune and Suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.