शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Rain In Maharashtra: महाराष्ट्रात पुढील ३ दिवस पावसाचे; सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज' अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:10 IST

पुण्याच्या आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून आज सायंकाळानंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज

पुणे : सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी (दि.१२) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून, या सर्व जिल्ह्यांना ‘ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे, तर अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात गुरुवारी (दि.१२) व शुक्रवारी (दि.१३) मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस उत्तर कोकण ते उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हेवगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, सर्व जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्याच्या आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, सायंकाळानंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राज्यात यंदा पावसाचे लवकर आगमन झाले आणि राज्यातील सर्वच भागात पावसाने धुवाधार बॅटिंग केली. त्यांनतर २८ मेपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, आता गुरुवारपासून (दि. १२) पावसाचे राज्यात पुन्हा आगमन होणार असून, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील बहुतांश भागात पाऊस बरसणार आहे.

पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात घट

पावसामुळे मध्य महाराष्ट्रासह कोकण गोवा आणि विदर्भ व मराठवाड्यातील कमाल तापमानाच्या पाऱ्यात काहीअंशी घट झाली आहे. मात्र, सांगली, कोल्हापूर, परभणीमधील तापमानाचा पारा तिशीच्या वर गेला असून, विदर्भातील अकोला व अमरावतीमधील कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला आहे. सर्वाधिक तापमान अमरावती येथे ३९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्रNatureनिसर्गTemperatureतापमानVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा