Railway | पुणे- निझामुद्दीन एक्स्प्रेसच्या मार्गात बदल; यार्ड रिमोल्डिंगच्या कामामुळे नवीन मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 04:15 PM2023-03-04T16:15:27+5:302023-03-04T16:16:24+5:30

काही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे...

Railway Pune- Nizamuddin Express Route Change; New path due to yard remodeling work | Railway | पुणे- निझामुद्दीन एक्स्प्रेसच्या मार्गात बदल; यार्ड रिमोल्डिंगच्या कामामुळे नवीन मार्ग

Railway | पुणे- निझामुद्दीन एक्स्प्रेसच्या मार्गात बदल; यार्ड रिमोल्डिंगच्या कामामुळे नवीन मार्ग

googlenewsNext

पुणे : पश्चिम रेल्वेतीलमुंबई विभागाच्या उधना रेल्वेस्थानकावर सुरू असलेल्या यार्ड रिमोल्डिंगच्या कामामुळे ५ मार्चला काही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

पुण्याहून सुटणारी रेल्वे नं. १२४९३ पुणे- हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस पुणे- मनमाड- भुसावळ- इटारसी- भोपाळ- आग्रा कँटमार्गे ५ मार्च रोजी धावणार आहे. तसेच रेल्वे नं. १२९३९ पुणे- जयपूर एक्स्प्रेसदेखील पुणे- मनमाड- भुसावळ- इटारसी- भोपाळ- नागदा सवाई माधोपूरमार्गे धावेल.

यासह रेल्वे नं. ११०९० पुणे- भगत की कोठी एक्स्प्रेस देखील मनमाड- खांडवा- इटारसी- भोपाळ- रतलाम- चित्तोडगढ- अजमेरमार्गे धावेल. तसेच ४ मार्च रोजी रवाना होणारी रेल्वे नं. २२१९३ दौंड- ग्वालियार एक्स्प्रेसदेखील मनमाड- भुसावळ- इटारसी- भोपाळ- बीना- गुना या परिवर्तित मार्गाने धावणार आहे.

Web Title: Railway Pune- Nizamuddin Express Route Change; New path due to yard remodeling work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.